शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

परिचारिकांचा पांढरा गणवेश झाला बदामी

By admin | Updated: August 26, 2015 02:34 IST

रुग्णालयाच्या गंभीर वातावरणात पांढऱ्याशुभ्र गणवेशात वावरणाऱ्या परिचारिका आता बदामी गणवेशात दिसणार आहेत.

न्यायालयाचा निर्णय : जिल्ह्यात स्वागतयवतमाळ : रुग्णालयाच्या गंभीर वातावरणात पांढऱ्याशुभ्र गणवेशात वावरणाऱ्या परिचारिका आता बदामी गणवेशात दिसणार आहेत. गणवेशाच्या रंगात बदल करणाऱ्या न्यायालयाच्या या निर्णयाचे यवतमाळातील परिचारिकांनी स्वागत केले आहे.रुग्णसेवा करताना पांढरा गणवेश स्वच्छ राखणे कठीण जाते. तो लगेच मळतो. ही बाब लक्षात घेऊन परिचारिकांनी गणवेशाचा रंग बदलून मिळावा, अशी मागणी केली होती. राज्यभरातील परिचारिकांनी बदामी रंगाच्या गणवेशासाठी गेल्या २०-२५ वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावाही केला. मात्र, दाद मिळत नसल्याने महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनने २०१२ साली अखेर न्यायालयाचे दार ठोठवावे लागले. या याचिकेवर सोमवारी २४ आॅगस्ट रोजी निर्णय दिला. त्यात परिचारिकांचा गणवेश बदामी रंगाचा असावा, या बाबीला मान्यता देण्यात आली आहे.आता राज्यभरातील शासकीय रुग्णालयांतील परिचारिकांना बदामी रंगाची साडी किंवा बदामी रंगाचा सलवार कमीज व पांढऱ्या रंगाचा अ‍ॅप्रन असा गणवेश परिधान करावा लागणार आहे. वैद्यकीय शिक्षण व संशोधन परिषदेनेही तसे जाहीर केले आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील सरकारी क्षेत्रातील सर्व परिचारिकांनी यापुढे बदामी गणवेशातच कर्तव्यावर हजर व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशनच्या यवतमाळ येथील अध्यक्ष शोभा खडसे यांनी केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)