अजून कोणते जीवघेणे कफ सिरप? यवतमाळमध्ये सहा वर्षांच्या मुलाचा खोकल्याचे औषधें घेतल्याने मृत्यू? औषधीचे नमुने दिले प्रयोगशाळेत

By सुरेंद्र राऊत | Updated: October 13, 2025 13:04 IST2025-10-13T13:01:36+5:302025-10-13T13:04:27+5:30

खासगी रुग्णालयात उपचार : सर्दी-खोकल्यासाठी केली होती तपासणी, अचानक प्रकृती बिघडली

What other deadly cough syrup? Six-year-old boy dies in Yavatmal after taking cough medicine? Samples of medicine given to laboratory | अजून कोणते जीवघेणे कफ सिरप? यवतमाळमध्ये सहा वर्षांच्या मुलाचा खोकल्याचे औषधें घेतल्याने मृत्यू? औषधीचे नमुने दिले प्रयोगशाळेत

What other deadly cough syrup? Six-year-old boy dies in Yavatmal after taking cough medicine? Samples of medicine given to laboratory

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ :
कफ सिरपमुळे २२ मध्य प्रदेश येथील बालकांच्या मृत्यूचे प्रकरण ताजे असताना, जिल्ह्यातील पिंपळखुटी (ता. कळंब) येथील बालकाचा सर्दी खोकल्याची औषधी घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी ७ ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला. सहा वर्षांच्या बालकाने यवतमाळ शहरातील बालरोगतज्ज्ञाकडून ४ व ६ ऑक्टोबर रोजी दोन दिवस औषध उपचार घेतले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी बाळाची प्रकृती बिघडली. पालकांनी त्याला त्या बालरोगतज्ज्ञाकडे नेले, त्यांनी बाळाला शासकीय रुग्णालयात रेफर केले. बालकाचा मृत्यू झाल्याने शवचिकित्सा केली. त्यानंतर एफडीएने संबंधित रुग्णालयातील मेडिकलमधून पाच औषधांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविले. या घटनेने प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे.

वीर वामनराव चौक येथील बालरोगतज्ज्ञाकडे सहा वर्षांच्या बाळाला सर्दी खोकल्याचा त्रास असल्याने पालकांनी उपचारासाठी आणले. ४ ऑक्टोबर रोजी प्रथम तपासणी करून ते गावी गेले. मात्र, दोन दिवसांच्या औषधानंतरही आराम नसल्याने त्यांनी पुन्हा ६ ऑक्टोबर रोजी बालरोगतज्ज्ञाचे हॉस्पिटल गाठले. औषधी बदलून देण्यात आली. सर्दी-खोकल्याची नवी औषधी घेऊन पालक गावी पोहोचले. तेथे दुसऱ्या दिवशी ७ऑक्टोबर रोजी सायंकाळी बालक अचानक बेशुद्ध पडले. त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. तातडीने पालकांनी बाळाला त्याच डॉक्टरकडे आणले. त्यांनी बाळाची प्रकृती पाहून हात वर करत त्याला शासकीय रुग्णालयात नेण्यास सांगितले. बाळाला अपघात कक्षातील डॉक्टरांनी तपासले असता त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.  संवेदनशील प्रकरण असल्याने त्या बाळाची शवचिकित्सा करण्यात आली.

बाळाचा व्हिसेरा रासायनिक विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला, तर इतर अवयव हिट्रॉपॅथालॉजीकडे तपासणीला दिले आहे. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून मेडिकल प्रशासनाने याची माहिती सहायक आयुक्त औषधी यांना दिली. जिल्हाधिकारी, आरोग्य सचिव यांनाही माहिती देण्यात आली. त्यानंतर औषधी प्रशासनाच्या पथकाने ते खासगी बालरुग्णालय गाठले. तेथील मेडिकलमधून बाळाला देण्यात आलेल्या सात औषधींचे नमुने घेतले. ही औषधी तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आली आहे.

'मेडिकल'च्या औषधांचीही तपासणी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे असलेल्या कफ सिरपचेसुद्धा नमुने तपासणीसाठी देण्यात आले आहे.
मध्य प्रदेशच्या प्रकरणानंतर खबरदारी म्हणून दोन बॅन्डच्या कफ सिरपचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.

तपासणी अहवालाची प्रतीक्षा

सहा वर्षांच्या बाळाचा मृत्यू हा सर्दी-खोकल्याचा औषधाने झाला की, आणखी दुसरे कोणते कारण आहे. याचा उलगडा शवचिकित्सा अहवालानंतरच होणार आहे. सोबत बाळाने घेतलेल्या औषधीची तीन दिवस गुणवत्ता काय यावरूनही हे ठरणार आहे. त्यासाठी प्रयोगशाळेतील तपासणी अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे.

"मेडिकल कॉलेज प्रशासनाकडून पत्र प्राप्त झाल्यानंतर तारक चाईल्ड हॉस्पिटल येथील माही मेडिकलमधून पाच औषधांचे नमुने घेतले. एका औषधीचा नमुना घेणे बाकी आहे."
- एम. के. काळेश्वरकर, सहायक आयुक्त, औषधी प्रशासन.
 

Web Title : यवतमाल: कफ सिरप के बाद बच्चे की मौत; नमूने परीक्षण के लिए भेजे गए

Web Summary : यवतमाल में कफ सिरप पीने के बाद एक बच्चे की मौत के बाद, अधिकारियों ने जांच शुरू कर दी है। दवा के नमूने कारण निर्धारित करने के लिए प्रयोगशाला में भेजे गए हैं।

Web Title : Yavatmal: Child Dies After Cough Syrup; Samples Sent for Testing

Web Summary : Following a child's death in Yavatmal after consuming cough syrup, suspected to be linked to a contaminated batch, authorities have launched an investigation. Samples of the medicine have been sent to the laboratory for testing to determine the cause.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.