शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
IPL 2026 : अभिषेक-हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
5
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
6
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
7
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
8
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
9
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
10
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
11
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
12
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
13
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
15
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
16
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
17
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
18
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
19
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
20
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनातून सुटका होताच उडणार लग्नांचा धूमधडाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2021 05:00 IST

गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे विवाह समारंभांवर प्रशासनाने विविध बंधने घातली होती. लग्नांचे तब्बल दोन हंगाम वाया गेले. त्यामुळे वय झालेल्या उपवर मुला-मुलींना लग्न जुळल्यानंतरही प्रत्यक्ष विवाहासाठी ताटकळत रहावे लागले. आता मात्र प्रशासनाने विवाह समारंभांवरील निर्बंध जवळपास हटविले आहे. त्यामुळे तुळशी विवाह होताच विवाह समारंभांचा धूमधडाका उडविला जाणार आहे. त्यासाठी आतापासूनच तारखा निश्चित करुन मंगल कार्यालयांचे बुकिंग केले जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाचे संकट आता जवळपास निवळले आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांनी लग्न समारंभ उरकण्यासाठी घाई सुरू केली आहे. १५ नोव्हेंबरला तुळशी विवाह आटोपताच लग्न समारंभांच्या तारखा निश्चित केल्या जात आहे. दरवर्षी फेब्रुवारी, मार्चमध्ये होणारी विवाह समारंभांची गर्दी यंदा नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्येच पहायला मिळणार आहे.गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे विवाह समारंभांवर प्रशासनाने विविध बंधने घातली होती. लग्नांचे तब्बल दोन हंगाम वाया गेले. त्यामुळे वय झालेल्या उपवर मुला-मुलींना लग्न जुळल्यानंतरही प्रत्यक्ष विवाहासाठी ताटकळत रहावे लागले. आता मात्र प्रशासनाने विवाह समारंभांवरील निर्बंध जवळपास हटविले आहे. त्यामुळे तुळशी विवाह होताच विवाह समारंभांचा धूमधडाका उडविला जाणार आहे. त्यासाठी आतापासूनच तारखा निश्चित करुन मंगल कार्यालयांचे बुकिंग केले जाणार आहे. दिवाळीच्या चकल्या संपताच विवाहांचे लाडू फुटणार आहे. 

मंगल कार्यालय बुक केले का ?- कोरोनाच्या निर्बंधातून सूट मिळताच अनेकांनी एकाच वेळी लग्न समारंभ उरकण्याची घाई सुरू केली आहे. त्यामुळे मंगल कार्यालये तडकाफडकी बुक करण्याकडे कल वाढला आहे. यवतमाळ शहरासह पांढरकवडा, पुसद, वणी, आर्णीत बुकिंग वाढल्याच्या व्यावसायिकांच्या प्रतिक्रिया आहे.जानेवारी, फेब्रुवारीमध्येच समारंभांना खरा रंग- कोरोना संकटानंतर नोव्हेंबर, डिसेंबरमध्येच अनेकांनी लगीन घाई सुरू केली असली तरी लग्न समारंभांची खरी गर्दी जानेवारी, फेब्रुवारीमध्येच दिसणार आहे. या काळात मुला-मुलींच्या शिक्षणाची गडबड बऱ्यापैकी कमी झालेली असते. शेतीच्या कामांनाही उतार पडलेला असतो. म्हणून हे महिने निवडले जातात.

तसे पाहिल्यास यंदा लग्नाचे मुहूर्त कमी आहे. मात्र तुळसी विवाहानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये काही लग्न मुहूर्त आहेत. कोरोनामुळे थांबलेले विवाह या काळात करणे सोईचे ठरणार आहे. अनेक जण या काळातील मुहूर्तांबाबत विचारणाही करीत आहे. - मधुकर लोहकरे, ज्योतिषी

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmarriageलग्न