शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी भागातील पाणीसाठ्याचे सर्वेक्षण

By admin | Updated: July 11, 2016 02:14 IST

दुष्काळी भागातील पाणीसाठ्याचे सर्वेक्षण शासनामार्फत प्राधिकृत सीआयआय त्रिवेणी वॉटर इन्सिट्यूटच्या चमूमार्फत लवकरच करण्यात येणार आहे.

यवतमाळचा समावेश : पाण्याची तपशीलवार माहिती करणार गोळायवतमाळ : दुष्काळी भागातील पाणीसाठ्याचे सर्वेक्षण शासनामार्फत प्राधिकृत सीआयआय त्रिवेणी वॉटर इन्सिट्यूटच्या चमूमार्फत लवकरच करण्यात येणार आहे. त्यासाठी यवतमाळसह राज्यातील १३ जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. गेल्या दोन-तीन वर्षात राज्यात अत्यल्प पाऊस झाल्याने राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये पाण्याची उपलब्धता, पाणी उपलब्ध करून घेण्याची सुलभता आणि पाण्याची मागणी याबाबतची तपशीलवार माहिती संकलित करण्यासाठी सीआयआय या संस्थेच्या त्रिवेणी वॉटर इन्स्टिट्यूटच्या वतीने वॅटस्कॅ न या प्रणालीची निर्मिती करण्यात आली आहे. या प्रणालीचा वापर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील दुष्काळग्रस्त १३ जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार त्रिवेणी वॉटर इन्सिट्यूटच्या चमूमार्फत निवड करण्यात आलेल्या राज्यातील दुष्काळी १३ जिल्ह्यातील पाणीसाठ्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासंदर्भात शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागामार्फत २ जुलै रोजी सबंधित जिल्ह्यांना पाठविण्यात आले आहे. दुष्काळी भागातील पाण्याची उपलब्धता, पाणी उपलब्ध करून घेण्याची सुलभता, पाण्याची मागणी व पुरवठा याबाबत सर्वेक्षण करण्यासाठी शासनामार्फत यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम, बीड, औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, सोलापूर व नंदूरबार या तेरा जिल्ह्यांचा समावेश आहे. यवतमाळ जिल्ह्यातील जलसाठ्यांची माहिती संकलित करून त्याचा अहवाल शासनाला पाठविला जाणार आहे. त्यावरून वर्षभराच्या पाण्याचे नियोजन करणे सोपे जाणार आहे. (प्रतिनिधी)संभाव्य नियोजनासाठी मदतदुष्काळी भागातील पाणीसाठ्याचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्वेक्षणात घेण्यात येणाऱ्या तपशीलवार माहितीच्या आधारे जिल्हानिहाय पाणी कृती आराखडा तयार करण्यासाठी मदत होणार आहे. भविष्याच्या दृष्टीकोणातून संभाव्य नियोजन चांगल्या पद्धतीने होऊ शकणार आहे.