खरिपातील नुकसानीच्या दीड कोटींची प्रतीक्षा

By Admin | Updated: May 30, 2015 02:36 IST2015-05-30T02:36:45+5:302015-05-30T02:36:45+5:30

तालुक्यात २०१४ च्या खरीप हंगामामध्ये दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. शेतकऱ्यांना मदत म्हणून तालुक्यासाठी १५ कोटी मंजूर झाले.

Waiting for one crore crores of Kharif damages | खरिपातील नुकसानीच्या दीड कोटींची प्रतीक्षा

खरिपातील नुकसानीच्या दीड कोटींची प्रतीक्षा

घाटंजी : तालुक्यात २०१४ च्या खरीप हंगामामध्ये दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. शेतकऱ्यांना मदत म्हणून तालुक्यासाठी १५ कोटी मंजूर झाले. त्यापैकी १२ कोटी २७ लाख ३० हजार रुपये वितरित झाले आहे. त्या उपरही तालुक्याला आणखी एक कोटी ३० लाख रुपयांची गरज आहे. तशी मागणीसुद्धा तालुका प्रशासनाने केली आहे.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना २७ मार्चपर्यंत २ हजार २७० शेतकऱ्यांनी १२ कोटी २७ लाख ३० हजारांची मदत घेतली. मात्र या वेळेत अनेक खातेदारांच्या याद्या व त्यांचे खाते क्रमांक प्राप्त न झाल्याने आलेल्या निधीतील तीन कोटी रुपये परत गेले. त्यामुळे बरेच शेतकरी मदतीपासून वंचित राहिले. अशा शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत ८२ गावातील १ हजार ६०७ शेतकरी निवडण्यात आले आहे. त्यांना ८७ लाख रुपये मदत दे१णे बाकी आहे. निधी प्राप्त होताच त्यांना ही मदत मिळणार आहे. यात ९४६ अल्पभूधारक शेतकरी असून, त्यांना ५७ लाख १० हजार ५८५ रुपये, बहुभूधारक ६५८ शेतकऱ्यांना २९ लाख ५८ हजार रुपये दिले जाणार आहे. फळ पिकांचे दोन खातेदार असून, त्यांना २४ हजार रुपये दिले जाणार आहे.
तालुक्यातील १२२ गावांमध्ये ८२ गावांच्या याद्या प्राप्त झाल्या आहेत. त्यात दुष्काळग्रस्त आणखी ४० गावांचा समावेश होणार आहे. या सर्व वंचित शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी तालुका प्रशासनाने एक कोटी ३० लाखांची मागणी केली आहे. शेतकऱ्यांना ही मदत त्वरित मिळाल्यास या खरीप हंगामात बी-बियाणे व खत खरेदी करता येईल. या मदतीकडे बुडत्याल काठीचा आधार या भावनेने शेतकरी वाट पाहत आहेत. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Waiting for one crore crores of Kharif damages