शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

आज मतदान

By admin | Updated: October 14, 2014 23:23 IST

जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात बुधवार १५ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत जिल्ह्यातील २० लाख २५ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीसाठी

विधानसभा निवडणूक : सात मतदारसंघात १०३ उमेदवार यवतमाळ - लोकमत वृत्तसेवा जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात बुधवार १५ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत जिल्ह्यातील २० लाख २५ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीसाठी सज्ज झाली असून मंगळवारी पोलिंग पार्ट्या जिल्ह्यातील २ हजार ३३६ मतदान केंद्रावर रवाना झाल्या आहेत. या निवडणुकीसाठी १० हजार ७०२ कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून केंद्रीय आणि राज्य राखीव दलासह तीन हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. प्रत्येकाने आपल्या मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी केले आहे. जिल्ह्यातील वणी, राळेगाव, यवतमाळ, दिग्रस, आर्णी, पुसद आणि उमरखेड या मतदारसंघात बुधवारी १५ आॅक्टोबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या सात मतदारसंघात १०३ उमेदवार रिंगणात असून त्यात वणी १३, राळेगाव १०, यवतमाळ २२, दिग्रस १३, आर्णी ११, पुसद १५ आणि उमरखेड मतदारसंघात १९ उमेदवारांचा समावेश आहे. जिल्ह्यात दोन हजार ३३६ मतदान केंद्र असून वणी ३०९, राळेगाव ३४१, यवतमाळ ३८७, दिग्रस ३४८, आर्णी ३४३, पुसद २९६, उमरखेड ३१२ मतदान केंद्रांचा समावेश आहे.सर्व सातही विधानसभा मतदारसंघात २० लाख २५ हजार ९१८ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे. त्यात वणी मतदारसंघात दोन लाख ६८ हजार ६३९, राळेगाव दोन लाख ६९ हजार ५५५, यवतमाळ तीन लाख ४३ हजार ३९०, दिग्रस दोन लाख ९५ हजार ८१३, आर्णी दोन लाख ८७ हजार २९२, पुसद दोन लाख ८१ हजार ५७३ तर उमरखेड विधानसभा मतदारसंघात २ लाख ७९ हजार ५८६ मतदार आपला हक्क बजावतील. जिल्ह्यातील २ हजार ३३६ केंद्रावर मतदान होणार असून त्यातील ९८ केंद्र संवेदनशील आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडावी यासाठी केंद्रीय राखीव दल, राज्य राखीव दल आणि स्थानिक पोलिसांचा तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. मंगळवारी जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिंग पार्टी रवाना झाली आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी स्वतंत्र निरीक्षक देण्यात आला आहे. एसटी बसेस आणि इतर वाहनाने पोलिंग पार्टी मतदान केंद्रावर पोहोचविण्यात आली. पांढरकवडा तालुक्यातील मतदान केंद्रावर घेऊन जाणाऱ्या एक बस नादुरुस्त झाली तर दुसरी रस्त्याच्या खाली उतरली होती. त्यामुळे तेथे पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.