शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
4
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
5
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
6
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
7
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
8
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
9
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
10
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
11
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
12
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
13
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
14
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
15
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
16
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
17
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
18
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
19
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
20
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांकडून नियमाचे उल्लंघन

By admin | Updated: November 17, 2016 01:35 IST

वणी नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष व नगरसेवकपदासाठी उभ्या असलेल्या उमेदवारांकडून नियमाचे उघडपणे उल्लंघन होत आहे.

धावत्या वाहनातून प्रचार : निवडणूक विभागाचा कारवाईचा इशारावणी : वणी नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष व नगरसेवकपदासाठी उभ्या असलेल्या उमेदवारांकडून नियमाचे उघडपणे उल्लंघन होत आहे. धावत्या वाहनातून प्रचार करण्यावर निवडणूक विभागाने बंदी घातली असली तरी उमेदवारांच्या प्रचार वाहनांकडून या बंदीला पायदळी तुडविले जात आहे. बहुतांश उमेदवारांची प्रचार वाहने धावत्या वाहनातूनच प्रचार करीत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, जाहीर प्रचाराच्या पाचव्या दिवशी ही बाब निवडणूक विभागाच्या निदर्शनास आल्यानंतर बुधवारी निवडणूक विभागाच्या पथकाने संबंधित उमेदवारांना धावत्या वाहनातून प्रचार करण्यावर चाप आणला. अनेक वर्षानंतर वणीचे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. प्रचारात आघाडी घेण्यासाठी उमेदवारांमध्ये चांगलीच चढाओढ निर्माण झाली आहे. वॉर्डावॉर्डात प्रचाराची वाहने धूळ उडवित फिरत आहेत. यातून ध्वनी प्रदूषणही वाढले आहे. कानठळ्या बसेल अशा आवाजात हा प्रचार सुरू असल्याने सामान्यांची डोकेदुखी वाढली आहे. नगराध्यक्षपदासाठी १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. यांपैकी प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर प्रचारासाठी चारचाकी वाहने लावली आहेत. या वाहनांकडून शहरातील गल्लीबोळा पिंजून काढल्या जात आहेत. प्रत्येक उमेदवाराने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे या उमेदवारांनी प्रचारावर चांगलाच भर दिला आहे. नियमानुसार धावत्या वाहनातून प्रचार करता येत नाही. मात्र वणीत या नियमाला तिलांजली दिली जात आहे. राजकीय पक्षांच्या उमेदवारांचा प्रचार धावत्या वाहनातून केला जात आहे. दरम्यान, बुधवारी दुपारी येथील निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शिवानंद मिश्रा यांनी याची दखल घेत उमेदवारांना याबाबत तंबी दिली. मात्र सायंकाळपर्यंत धावत्या वाहनातूनच प्रचार सुरू होता. (कार्यालय प्रतिनिधी)