शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
3
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
4
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
5
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
6
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
7
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
8
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
9
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
10
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
11
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
12
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
13
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
14
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
15
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
16
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
17
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
18
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
19
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
20
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

दिग्रसमध्ये दिग्गज आमने-सामने, २० वर्षापूर्वीही संजय राठोड विरुद्ध माणिकराव ठाकरे झाली होती लढत

By विशाल सोनटक्के | Updated: November 8, 2024 07:46 IST

Maharashtra Assembly Election 2024: दिग्रस विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान मंत्री संजय राठोड तर महाविकास आघाडीकडून माजी मंत्री माणिकराव ठाकरे यांच्यात अत्यंत चुरशीचा सामना रंगला आहे. 

- विशाल सोनटक्केयवतमाळ - दिग्रस विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान मंत्री संजय राठोड तर महाविकास आघाडीकडून माजी मंत्री माणिकराव ठाकरे यांच्यात अत्यंत चुरशीचा सामना रंगला आहे. 

सलग चार वेळा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे माणिकराव ठाकरे यांचा पराभव २००४ च्या निवडणुकात त्यावेळी नवख्या असलेल्या संजय राठोड यांनी केला होता. त्यानंतर २००९, २०१४ व २०१९ अशा सलग तीन निवडणुकांत विजयाची हॅट्‌ट्रिक साधत संजय राठोड मोठ्या मताधिक्याने विजयी होत गेेले. यंदा महाविकास आघाडीकडून नेर नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष पवन जयस्वाल यांच्या उमेदवारीची घोषणा झाली होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी यात दुरुस्ती करून माणिकराव ठाकरे यांना मैदानात उतरविण्यात आले. दोन दिग्गज उमेदवारांमुळे यंदा दिग्रसमधील लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

आजी-माजी मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला  विद्यमान मंत्री महायुतीचे उमेदवार संजय राठोड विरुद्ध माजी मंत्री महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांच्यात चुरशीचा सामना होत आहे. पाच वर्षात केलेली कामे संजय राठोड सांगत आहेत. तर महागाई, शेतमालाच्या भावावरून माणिकराव ठाकरे त्यांना घेरण्याचा प्रयत्न करीत आहे.  

लोकसभेमध्ये काय घडले, परिणाम काय?- लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे संजय देशमुख विजयी झाले. त्यांनी महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांचा ९४ हजार ४७३ मतांनी पराभव केला. - लोकसभा निवडणुकीत शिंदेसेनेचे संजय राठोड यांच्या दिग्रस विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांना तब्बल ८ हजार ६६७ इतके मताधिक्य मिळालेले आहे. 

निवडणुकीतील कळीचे मुद्देमतदारसंघातील दारव्हा, दिग्रस आणि नेर या तीन तालुक्यात एमआयडीसी आहे, परंतु एकही मोठा उद्योग नाही. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न आहे. अडाण, मध्यम प्रकल्प तसेच अरुणावती प्रकल्प जुने झाले असून कॅनाॅल नादुरूस्त असल्याने सिंचनाचे अपेक्षित क्षेत्र गाठले जात नाही.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Manikrao Thakareमाणिकराव ठाकरेSanjay Rathodसंजय राठोडdigras-acदिग्रस