शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
2
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
5
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
6
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
7
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
8
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
9
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
10
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
11
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
12
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
13
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
14
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
15
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
16
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
17
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
18
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
19
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
20
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीत वाहने तुंबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 06:00 IST

रविवारी वणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात कापूस घेऊन आलेली ९३६ वाहने उभी होती. गेल्या तीन दिवसात यातील अर्धेअधिक कापूस गाड्या सीसीआयने खरेदी केल्या. परंतु अजुनही कापसाची आवक सुरूच असल्याने सीसीआयचे अधिकारी हतबल झाले आहेत. वणी परिसरात सीसीआयने किरायाने केलेले जिनिंग हाऊसफुल्ल झाले आहेत. नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ याठिकाणीदेखील कापूस साठवायला जागा नाही.

ठळक मुद्देकापसाची आवक सुरूच : शेतकऱ्यांचा वणीत तीन-तीन दिवस मुक्काम

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : एकीकडे सीसीआयकडे कापूस साठविण्यासाठी जागाच उपलब्ध नसताना दुसरीकडे मात्र कापसाची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू असल्याने सीसीआयचे अधिकारी चांगलेच अडचणीत आले आहेत. बाहेर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर येथे कापूस विक्रीसाठी येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची गर्दी वाढत आहे.रविवारी वणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात कापूस घेऊन आलेली ९३६ वाहने उभी होती. गेल्या तीन दिवसात यातील अर्धेअधिक कापूस गाड्या सीसीआयने खरेदी केल्या. परंतु अजुनही कापसाची आवक सुरूच असल्याने सीसीआयचे अधिकारी हतबल झाले आहेत. वणी परिसरात सीसीआयने किरायाने केलेले जिनिंग हाऊसफुल्ल झाले आहेत. नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ याठिकाणीदेखील कापूस साठवायला जागा नाही. अशा परिस्थितीत खरेदी केलेला कापूस ठेवायचा कुठे, या विवंचनेत सीसीआयचे अधिकारी सापडले आहेत. खरेदी केलेल्या कापसाची व्यवस्था लावताना या अधिकाºयांची चांगलीच दमछाक होत आहे. त्यामुळे कापूस खरेदीची प्रक्रिया मंदावली आहे. दुसरीकडे शेतकºयांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने शेतकºयांना वणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात तीन-तीन दिवस मुक्काम ठोकावा लागत आहे. बैलबंडीने कापूस आणणाºया शेतकºयांना बाहेरून चारा आणून बैलांची भूक भागवावी लागत आहे. एकूणच वणीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत बिकट परिस्थिती निर्माण झाली असल्याचे चित्र पहायला मिळाले.शेतकऱ्यांना संयम ठेवण्याचे आवाहनसीसीआयने मंगळवारपर्यंत एकूण पाच लाख २५ हजार ५१५ क्विंटल कापूस खरेदी केला. त्यात शिंदोला येथील बाजार समितीच्या उपकेंद्रावर एक लाख ७१ हजार ३८३, तर वणी बाजार समितीत तीन लाख ५४ हजार १३२ क्विंटल कापूस खरेदी केला. सीसीआय प्रत्येकच गाडी खरेदी करणार आहे. परंतु सध्यस्थिती लक्षात घेता शेतकºयांनी थोडा संयम बाळगावा, असे आवाहन सीसीआयने केले आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड