शहरं
Join us  
Trending Stories
1
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
2
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
7
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
8
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
11
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
12
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
13
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
14
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
15
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
16
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
17
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
18
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
19
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
20
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
Daily Top 2Weekly Top 5

चापडोहचे मतदार नगरपरिषदेच्या यादीत

By admin | Updated: October 19, 2016 00:38 IST

शहरालगतच्या चापडोह पुनर्वसन येथील ३५० नागरिकांची नावे चक्क यवतमाळ नगरपरिषदेच्या मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहे.

सीओंनी मागितला पुरावा : ग्रामपंचायत सदस्यांची तक्रार बेदखलयवतमाळ : शहरालगतच्या चापडोह पुनर्वसन येथील ३५० नागरिकांची नावे चक्क यवतमाळ नगरपरिषदेच्या मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहे. ही बाब उघड होताच एकच खळबळ उडाली. यामुळे धास्तावलेल्या चापडोह ग्रामपंचायत सदस्यांनी सीओंकडे तक्रार केली. मात्र ही तक्रार निकाली काढताना चौकशीऐवजी तक्रारकर्त्यांनाच पुरावे सादर करण्याचा आदेश दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्यात आली आहे. या यादीचे प्रारूप प्रसिद्ध करून आक्षेप मागविण्यात आले. मात्र यातील चुकांमुळे हजारांच्यावर आक्षेप दाखल झाले. आता हे आक्षेप निकाली काढतानासुद्धा झालेल्या चुकांवर पांघरून घालण्याचा प्रकार नगरपरिषदेत सुरू आहे. शहराच्या भोसा परिसराला लागून असलेल्या चापडोह पुनर्वसन येथील ३५० नागरिकांची नावे कोणत्याही सर्व्हेक्षणाशिवाय थेट नगरपरिषद मतदार यादीत समाविष्ठ करण्यात आली. गावातील ४२५ मतदारांपैकी ३५० नावे नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक २० मध्ये दाखविण्यात आली आहे. या प्रतापामुळे चापडोह ग्रामपंचायतीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. ही बाब कळताच येथील सरपंच व ग्रामस्थांना धक्काच बसला. त्यामुळे सरपंच दत्ता बावणे, सदस्य विनोद केराम, पुष्पा फुपरे, सुशिला कोवे यांनी चापडोह येथील सर्व्हे नंबर ९४,९५ आणि ९६ यांचा सातबारा पुराव्या दाखल तक्रारीसोबत जोडून सीओकडे तक्रार केली. अशीच तक्रार मनवर शहा यांनीसुद्धा दिली आहे. या तक्रारीवर सुणावणीत सीओंनी चक्क पुरावे सादर करण्याचे आदेश दिले. शहरी भागातसुद्धा प्रभाग २० मधील २५० मतदारांची नावे प्रभाग दहामध्ये जोडली आहे. केवळ काही व्यक्तींच्या राजकीय सोयीसाठी नियमबाह्य काम होत असून तक्रारींची दखल घेतली जात नाही, असा आरोप आता करण्यात आला आहे. या प्रकरणात योग्य न्याय न मिळाल्यास उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे मनवर शहा यांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)