शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

वसंतराव नाईक यांची हरित प्रेरणा देणारी सायकल

By admin | Updated: July 1, 2016 02:34 IST

हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी शेतीनिष्ठ शेतकरी परशराम भागडे यांना बक्षीस म्हणून तब्बल ४८ वर्षापूर्वी सायकल दिली होती.

आपुलकीचे बक्षीस : ४८ वर्षांपासून जपल्या स्मृती
मुकेश इंगोले  दारव्हा
हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी शेतीनिष्ठ शेतकरी परशराम भागडे यांना बक्षीस म्हणून तब्बल ४८ वर्षापूर्वी सायकल दिली होती. या सायकलीवरून दारव्हा तालुक्यात परशराम भागडे यांनी हरितक्रांतीची प्रेरणा शेतकऱ्यांमध्ये निर्माण केली. आज ही सायकल त्यांच्या मुलाने गत ४८ वर्षापासून आपुलकीचा ठेवा म्हणून जपून ठेवली आहे.
वसंतराव नाईक आणि शेती हे समीकरणच झाले होते. कृषीक्रांती करून वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राला दुष्काळाच्या खाईतून बाहेर काढले. शेतकरी, शेतमजुरांवर ते भरभरुन प्रेम करायचे, १९६६ साली अवर्षणामुळे राज्यात भीषण स्थिती निर्माण झाली होती. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना हिंमत देण्यासाठी राज्यभर दौरे केले. त्यांची तळमळ पाहून अनेक शेतकरी प्रभावित झाले होते. शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. दारव्हा तालुक्यातील शेलोडी येथील शेतकरी परशराम बळीराम भागडे हेही नाईकांच्या विचारांनी प्रेरित झाले होते. आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करून भरघोस उत्पादन घेत होते.
त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून १५ आॅगस्ट १९६८ रोजी महाराष्ट्र शासनाने शेतीनिष्ठ पुरस्काराने भागडे यांचा गौरव केला. तत्कालीन राज्यपाल पी.व्ही. चेरियन यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. दारव्हा तालुक्यातून पहिला बहुमान भागडे यांना मिळाल्याने वसंतरावांनी त्यांचे कौतुक केले. एवढेच नाही तर परशराम भागडे यांना वसंतराव नाईक यांनी सायकल बक्षीस म्हणून दिली.
शेतकऱ्याला मिळालेली ती सायकल त्या काळी अनेकांना बळ देणारी ठरली. परशराम भागडे याच सायकलवरून गावागावात जाऊन शेतकऱ्यांमध्ये हरितक्रांतीची बिजे रोवत होती. काही काळानंतर परशराम भागडे यांचा मृत्यू झाला. परंतु ही अनमोल ठेव त्यांचे पूत्र विलास भागडे यांनी मोठ्या निष्ठेने जपली आहे. आजही ही सायकल त्यांच्या घरी आदराने ठेवलेली आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणारी ही सायकल आजही शेलोडी येथील शेतकऱ्यांना प्रेरणा देते.