शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त विविध कार्यक्रम

By admin | Updated: March 1, 2016 02:05 IST

गजानन महाराजांच्या प्रगटदिनानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध मंदिरांमध्ये भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे.

यवतमाळ : गजानन महाराजांच्या प्रगटदिनानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध मंदिरांमध्ये भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे.दारव्हा मार्गावरील कोल्हे ले-आउटमधील त्रिमूर्ती सोसायटीत प्रगटदिन महोत्सवाचे आयोेजन करण्यात आले आहे. २३ ते २९ फेब्रुवारीपर्यंत मोहन महाराज कठाळे यांच्या वाणीतून भागवतकथेचे आयोजन करण्यात आले होते. भागवत कथेचे श्रवण करण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी उपस्थिती नोंदविली होती. मंगळवारी सकाळी ६ वाजता अभिषेक आणि होमपूजन होणार आहे. तर ९.३० वाजता ‘श्रीं’च्या पालखीची मिरवणूक निघणार आहे. १ वाजता ह.भ.प सदानंद देशपांडे यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. सायंकाळी ७.१५ वाजता महाआरती, ७.३० ला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गजानन महाराज विश्वस्त मंडळ झटत आहे. प्रतिशेगाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणेशनगरातील संत गजानन महाराज मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २३ फेब्रुवारीपासून प्रगटदिन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारपर्यंत हा महोत्सव चालणार आहे. ‘श्रीं’च्या विजयग्रंथाचे पारायण, गायत्री दीपयज्ञ, संगीतमय विठ्ठल नामजप, कीर्तनमालेचे आयोजन करण्यात आले होते. १ मार्चला पंचकुंडी गायत्री यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. १२ वाजता काल्याचे कीर्तन, १ ते ५ पर्यंत महाप्रसाद आणि आरतीनंतर विशेष सामुदायिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संत गजानन महाराज समिती परिश्रम घेत आहे.स्थानिक सिंघानियानगरातील गजानन महाराज मंदिर संस्थानात संत गजानन महाराज प्रगट दिनोत्सव आयोजित करण्यात आला आहे. मंगळवार, १ मार्च रोजी सकाळी १० वाजता हभप विठ्ठलराव खानझोडे महाराज यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. दुपारी १२ ते ४ या वेळात महाप्रसाद होणार आहे. या कार्यक्रमांचा लाभ घेण्याची विनंती आयोजकांतर्फे करण्यात आली आहे. (शहर वार्ताहर)