महागाव शहरात रस्ते बांधकामात विहिरीतील दगड-मुरुमाचा वापर

By Admin | Updated: April 27, 2016 02:42 IST2016-04-27T02:42:16+5:302016-04-27T02:42:16+5:30

महागाव शहरात सध्या रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असून या कामावर विहिरीतील माती मिश्रीत मुरुम आणि दगडांची गिट्टी वापरली जात आहे.

Use of stone-murum in wells in Mahagaon city roads | महागाव शहरात रस्ते बांधकामात विहिरीतील दगड-मुरुमाचा वापर

महागाव शहरात रस्ते बांधकामात विहिरीतील दगड-मुरुमाचा वापर

गुणवत्तेचे तीनतेरा : जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
महागाव : महागाव शहरात सध्या रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असून या कामावर विहिरीतील माती मिश्रीत मुरुम आणि दगडांची गिट्टी वापरली जात आहे. या प्रकाराकडे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असून कामाची गुणवत्ताही ढासळत आहे.
जिल्हा परिषद बांधकाम विभाग १५ लाख रुपये खर्च करून शहरात डांबरी रस्ते तयार करीत आहे. या रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी शासकीय नियमाला तडे दिले जात आहे. माती मिश्रीत मुरुम आणि विहिरीतील दगड-मुुरुमाचा वापर केला जात आहे. गतवर्षी शहरातील करण्यात आलेल्या डांबरीकरणाची आठ दिवसात वाताहत झाली होती. त्याच ठेकेदारामार्फत पुन्हा नव्याने काम सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे महागाव तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकाही कामाचे ई-टेंडरिंग झाले नाही. सर्व गुणवत्ता गुंडाळून काम सुरू आहे.
सदर काम कोणत्या निधीतून आहे, रस्त्याची लांबी-रुंदी किती, काम सुरू कधी होणार, किती दिवसात पूर्ण होणार, यावर येणारा खर्च असा फलकही लावण्यात आलेला नाही. सर्व मोघम सुरू आहे. शासनाचे सर्व नियम बाजूला सारुन डांबरी रस्त्याचे दर्जाहीन काम सुरू असून यामुळे नागरिकांत रोष व्यक्त होत आहे. (शहर प्रतिनिधी)

गुणवत्ता विभागाचे दुर्लक्ष
महागाव तालुक्यात झालेल्या रस्ता बांधकामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाले आहे. अनेक पदाधिकारीच कंत्राटदार असल्याने त्यांच्या कामाची गुणवत्ता पूर्णत: ढासाळली आहे. याबाबत कुणी तक्रार केल्यास पदाधिकाऱ्याचे काम असल्याने कुणी लक्षही देत नाही. यामुळे अवघ्या महिन्या दोन महिन्यातच रस्ता बांधकाम उखडलेले दिसून येते. याबाबत गुणवत्ता नियंत्रण विभागाकडे अनेकदा तक्रारी करण्यात आल्या. परंतु हा विभागही या रस्त्याची पाहणी करून कारवाई करीत नाही.

Web Title: Use of stone-murum in wells in Mahagaon city roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.