शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय राज्यमंत्र्यांनी घेतला दुष्काळी स्थितीचा आढावा

By admin | Updated: April 20, 2015 00:05 IST

जिल्ह्यात वातावरणातील अनियमीततेमुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे.

अधिकाऱ्यांना निर्देश : सिंचन सुविधेसह कृषी पंप वीज जोडणीचा अनुशेष दूर करण्याचा आदेशयवतमाळ : जिल्ह्यात वातावरणातील अनियमीततेमुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. खरीप, रबी या दोन्ही हंगामातील प्रमुख पिके उद्ध्वस्त झाली. याच स्थितीचा केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. या बैठकीला जिल्ह्यातील आमदार मदन येरावार, संजीवरेड्डी बोदकुरवार, प्रा. राजु तोडसाम, राजु नजरधने, डॉ. अशोक उईके आदी उपस्थित होते. जिल्ह्याच्या सिंचन सुविधेत अधिकाधिक वाढ होण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या कृषीपंपाना वीज जोडणी देण्याकरिता व्यापक मोहीम राबविण्याचे निर्देश अहीर यांनी दिले. वीज जोडण्या, विद्युत पुरवठा, सिंचन प्रकल्पाची दुरूस्ती ही कामे समाधानकारक नसल्याने केंद्रीय राज्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. प्रधानमंत्री ग्रामीण सिंचन योजना प्रभावीपणे राबवून त्याचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना केल्या. जलयुक्त शिवार योजनेची अंमलबजावणीही १०० टक्के लक्ष उराशी बाळगूनच केली जावी असे सांगितले. जिल्ह्यातील शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे, वीज आणि सिंचनासारख्या सुविधा आत्महत्याग्रस्त जिल्ह्यासाठी समपर्क पर्याय आहे. सरकारच्या सिंचनविषयक योजनांमध्ये कार्यरत एजन्सीज व ठेकेदारांकडून निश्चित कालावधीत पूर्ण करून घेण्यात यावी ही कामे उपयुक्त ठरतील व योग्य ठिकाणीत व्हावी याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, तालुकास्तरावर विकासकामांचा निधी वितरित करताना समतोल पाळण्यात आला नाही अशा तक्रारी लोकप्रतिनिधींनी केल्या आहेत. या तक्रारींचे निवारण करण्यासाठी समान निधी उपलब्ध करून देण्याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी असे हंसराज अहीर यांनी सांगितले. सर्व विकासकामांच्या देखरेखीसाठी विशेष यंत्रणा कार्यान्वित करावी असेही सांगण्यात आले. बैठकीत उपस्थित आमदारांनी आपल्या मतदारसंघातील समस्यांकडे लक्ष वेधले. अकाली पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांच्या पिकांची प्रचंड हानी झाली आहे. या नुकसानीचा वस्तूनिष्ठ सर्वे करण्यात यावा, नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा निधी तातडीने देण्यात यावा अशा सूचना अहीर यांनी दिल्या. (कार्यालय प्रतिनिधी)