शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
3
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
4
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
5
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
6
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
7
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
8
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
9
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
10
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
11
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
12
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
13
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
14
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
15
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
16
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
17
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
18
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
19
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
20
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा

Ganesh Chaturthi 2018; यवतमाळ जिल्ह्यात विडूळ येथे एकाच छताखाली गणपती आणि मोहरम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 9:27 PM

सध्या गणेशोत्सवाची धामधुम सुरु आहे. याच दरम्यान मोहरम हा धार्मिक सणसुध्दा आला आहे. या दोन्ही उत्सवाचे औचित्य साधून उमरखेड तालुक्यातील विडूळ येथील नागरिकांनी सामाजिक एकतेचे आदर्श उदाहरण समाजासमोर ठेवले आहे.

ठळक मुद्देपोलिसांचे प्रयत्न : सामाजिक एकतेचे आदर्श उदाहरण

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : सध्या संपूर्ण राज्यात गणेशोत्सवाची धामधुम सुरु आहे. याच दरम्यान मोहरम हा धार्मिक सणसुध्दा आला आहे. या दोन्ही उत्सवाचे औचित्य साधून उमरखेड तालुक्यातील विडूळ येथील नागरिकांनी सामाजिक एकतेचे आदर्श उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. येथील नालसाहेब देवस्थानात एकाच वेळेस गणेशोत्सव आणि मोहरम साजरा करण्यात येत आहे.नालसाहेब देवस्थानचे अध्यक्ष जयराम डांगे यांची चौथी पिढी मोहरम हा उत्सव परंपरेने साजरा करतात. त्यांच्या घराण्यामध्ये १३४ वषार्पासून ही परंपरा सुरु आहे. स्वत:च्या मालकीचे असलेले हे देवस्थान आता सार्वजनिक झाले आहे.२१ जानेवारी २०१५ रोजी या संस्थेची रितसर नोंदणी धर्मदाय आयुक्तांकडे करण्यात आली आहे. यावर्षी गणेशोत्सव व मोहरम हे एकाच वेळेस साजरे करण्यात येत आहे. ही बाब हेरून जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या सुचनेनुसार उमरखेडचे ठाणेदार हनुमंत गायकवाड यांनी ८ सप्टेंबर ला विडूळ येथील ग्रामपंचायतीमध्ये शांतता समितीची बैठक घेतली. या बैठकीत पोलीस प्रशासनाच्यावतीने विडूळ येथील नालसाहेब देवस्थानात एकाच वेळी एकाच ठिकाणी गणेशोत्सव आणि मोहरम साजरा करण्याची अभिनव संकल्पना मांडली. लगेच सर्व सदस्यांनी यास होकार दिला. या बैठकीत सर्व धर्माचे बांधव सहभागी झाले होते. एकमुखाने निर्णय झाल्यानंतर १३ सप्टेंबरला गणेशाची स्थापना केली, तर त्याच्याच बाजूला सव्वातीन फुटाची मोहरमची सवारी आहे. २० सप्टेंबरला मोहरम आणि गणेशोत्सवाची सांगता केल्यानंतर २२ सप्टेंबरला देवस्थानच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन केले आहे.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८