शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
5
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
6
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
8
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
9
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
10
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
11
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
12
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
13
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
14
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
16
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
17
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
18
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
19
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
20
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
Daily Top 2Weekly Top 5

‘उमेद’च्या ६५० कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम थांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 09:48 IST

‘उमेद’ अभियानातील ६५० कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामकाज अचानक थांबविण्यात आल्याने त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. आणखी साडेतीन हजार कर्मचारी शासनाच्या निशाण्यावर असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देआणखी साडेतीन हजार कर्मचारी निशाण्यावर

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बचत गटांच्या उत्थानासाठी जिल्हा परिषदांमार्फत राबविल्या जाणाऱ्या ‘उमेद’ अभियानातील ६५० कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामकाज अचानक थांबविण्यात आल्याने त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. आणखी साडेतीन हजार कर्मचारी शासनाच्या निशाण्यावर असल्याची माहिती आहे.महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत बचत गटांसाठी ‘उमेद’च्या माध्यमातून काम केले जाते. या बचत गटामुळे गावे व महिला सशक्त होत आहेत. त्यात राज्यातील लाखो महिला या अभियानात सहभागी आहेत. ‘उमेद’ने त्यांना रोजगाराचे पाठबळ दिले. त्यातून गावस्तरावर अनेक उद्योग व्यवसाय उभे राहिले. मात्र कंत्राटी कर्मचारी कपातीमुळे या अभियानालाच घरघर लागल्याचे चित्र आहे. त्यांचे करार ‘उमेद’च्या सीईओंनी संपुष्टात आणले. आणखीही साडेतीन हजार कर्मचाऱ्यांचे काम थांबविण्याची चाचपणी केली जात असल्याने या ‘उमेद’ अभियानावरच जणू बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. यामुळे बचत गटांचे एकूण नेटवर्कच कोलमडण्याची भीती निर्माण झाली आहे.

खासगी संस्थांकडे नियंत्रणाचा घाटबचतगटांच्या माध्यमातून दरमहा राज्यभरात चार कोटींच्यावर बचत केली जाते. या खेळत्या भांडवलातील काही रक्कम दरमहा बँकांमध्ये जमा होते. यामुळे बचतगटांना ५०० कोटी रूपयांचे कर्ज उद्योगासाठी मिळाले. राज्य शासनाचाही काही निधी बचतगटांना मिळाला. बचत गटांवर शासकीय नियंत्रण असले तरी आता ते खासगी संस्थांकडे देण्याचा घाट घातला जात आहे. या बचत गटांच्या माध्यमातून राज्यातील लाखो महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व साक्षरही झाल्या आहेत.इतर राज्याने कर्मचाऱ्यांना नियमित केलेझारखंड, बिहार, केरळ आणि आंध्रप्रदेश या राज्यांनी बचतगटांची मोहीम राबविणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेतले. शासकीय मोहिमेचा एक भाग म्हणून हे अभियान राबविले. महाराष्ट्रात मात्र या ‘उमेद’ अभियानाची वाटचाल उफराट्या दिशेने सुरू असल्याचे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कपातीवरून दिसून येते.

टॅग्स :Governmentसरकार