शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

उमरखेडचा रबी हंगाम भारनियमनात अडकणार

By admin | Updated: November 4, 2016 02:09 IST

परतीच्या पावसाने खरीप हंगाम उद्ध्वस्त झाल्यानंतर संपूर्ण शेतकऱ्यांची आशा रबी हंगामावर आहे.

सिंचनात अडथळा : मुबलक पाणी, मात्र वीज अनियमितउमरखेड : परतीच्या पावसाने खरीप हंगाम उद्ध्वस्त झाल्यानंतर संपूर्ण शेतकऱ्यांची आशा रबी हंगामावर आहे. मुबलक पावसामुळे नदीनाले आणि विहिरींमध्ये तुडूंब पाणी आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. परंतु भारनियमनाचा कोलदांडा कायम असल्याने रबी हंगामही साधण्याची शक्यता नाही. सध्या हरभऱ्याची पेरणी केली जात असताना भारनियमनामुळे ओलीत करणे उमरखेड तालुक्यात अशक्य झाले आहे. गत काही वर्षांपासून उमरखेड तालुक्यातील शेतकरी सातत्याने दुष्काळाचा सामना करीत आहे. यावर्षी सुरुवातीला मुबलक पावसाने पीक परिस्थिती उत्तम होती. परंतु त्यानंतर पडलेला खंड आणि परतीच्या पावसाने सोयाबीन पुरते उद्ध्वस्त झाले. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटले होते. त्यानंतरही हाती आलेला सोयाबीन बाजारात कमी दरात विकावा लागला. याचा फटका शेतकऱ्यांना बसला. अशीच अवस्था कपाशीची आहे. कपाशीवर सध्या लाल्याने आक्रमण केले आहे. त्यामुळे कपाशीचे पीकही हातचे जाण्याची स्थिती आहे. सोयाबीन काढणी झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी रबी हंगामात हरभरा पेरण्याचे नियोजन केले आहे. शेत पेरणीसाठी सज्ज केले परंतु भारनियमनामुळे ओलित करणे शक्य होत नाही. सहा ते सात तासांचे भारनियमन होत असून रात्री-अपरात्री वीज पुरवठा होतो. तसेच कमी दाबाचा वीज पुरवठाही कायम असतो. याचा फटका रबीला बसत आहे.उमरखेड तालुक्यातील बंदी भागातील जेवली परिसरातील शेतकरी तर भारनियमनाने त्रस्त झाले आहे. पैनगंगेसह इतर जलस्रोतांवर मोटारपंप लावून शेतकऱ्यांनी रबीची तयारी केली. डोळ्याने मुबलक पाणी दिसत असतानाही ओलित करणे मात्र अशक्य होत आहे. वीज वितरण कंपनीने कृषी पंपांना योग्य वेळात योग्य दाबाने वीज पुरवठा करण्याचे आश्वासन दिले. परंतु अद्यापही बंदी भागात वीज पुरवठा सुरळीत झाला नाही. (शहर प्रतिनिधी)