शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

हिवताप कर्मचाऱ्यांचा शासनाला अल्टीमेटम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 06:00 IST

शासन निर्णयाविरोधात प्रत्येक जिल्हास्तरावर हिवताप विभाग हस्तांतरण विरोधी समितीची स्थापना करण्यात आली. गुरुवारी करण्यात आलेल्या धरणे कार्यक्रमप्रसंगी समितीचे अध्यक्ष सुभाष वानरे, अनिल परचाके, प्रकाश मुडाणकर, धनंजय मेश्राम, अनंता साबळे, रवी खडसे, दिनेश माहुरे, रितेश भगत आदींनी मार्गदर्शन केले.

ठळक मुद्देनिर्णय मागे घेण्यासाठी धरणे : जिल्हा परिषदेला हस्तांतरणास विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : हिवताप विभाग जिल्हा परिषदेला हस्तांतरणाविरोधात आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय समन्वय समितीने गुरुवारी घेतला. दरम्यान, गुरुवारी राज्यव्यापी कार्यक्रमांतर्गत येथील हिवताप कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. १८ डिसेंबरला नागपूर विधानभवनावर मोर्चा आणि मागणी मान्य न झाल्यास २६ डिसेंबरपासून बेमुदत कामबंदचा निर्धार समितीने केला आहे.केंद्र शासन पुरस्कृत हिवताप विभाग गेली ६५ वर्षांपासून राज्याच्या सहयोगाने यशस्वीपणे सुरू आहे. राज्यात या विभागाचे जवळपास १६ हजार कर्मचारी कार्यरत आहे. प्रामुख्याने ग्रामीण भागात सुयोग्य आणि परिणामकारक आरोग्यसेवा देत आहे. याशिवाय विविध राष्ट्रीय कार्यक्रमात महत्त्वाचा वाटा आहे. असे असताना सदर विभाग जिल्हा परिषदेत हस्तांतरणाचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे हिवताप विभागातील कर्मचाऱ्यांची प्रलंबित आर्थिक प्रकरणे, सेवानिवृत्तीची प्रकरणे, सेवा ज्येष्ठता, वेतन व भत्ते, भविष्य निर्वाह निधी प्रकरणे यावर विपरित परिणाम होणार आहे. हीच बाजू मांडत कर्मचाऱ्यांनी धरणे देऊन पुढील भूमिका जाहीर केली.शासन निर्णयाविरोधात प्रत्येक जिल्हास्तरावर हिवताप विभाग हस्तांतरण विरोधी समितीची स्थापना करण्यात आली. गुरुवारी करण्यात आलेल्या धरणे कार्यक्रमप्रसंगी समितीचे अध्यक्ष सुभाष वानरे, अनिल परचाके, प्रकाश मुडाणकर, धनंजय मेश्राम, अनंता साबळे, रवी खडसे, दिनेश माहुरे, रितेश भगत आदींनी मार्गदर्शन केले. पुढील आंदोलनाची भूमिका समन्वय समितीचे अध्यक्ष सुभाष वानरे यांनी जाहीर केली.आंदोलनात दिलीप मेश्राम, धीरज पिसे, रवी रामेकर, संतोष भोयर, अमोल सोनार, आशीष देशमुख, प्रदीप जुमनाके, वाय.जी. सोनटक्के, विष्णू लसवंते, अशोक चौधरी, किरण राठोड, प्रफुल्ल डेहनकर, दुधे, ए.ए. खंगार, एस.बी. जाधव, रवी खांडरे, आर.एस. आडे, अजय जोगदंड, राजेंद्र दवे, संजय डांगे, रेश्मा सेंगर, सुवर्णा सप्रे, अश्विनी हांडे, वसंत लांडे, आर.आर. आकडे आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :Healthआरोग्य