शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
3
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
4
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
5
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
6
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
7
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
8
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
9
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
10
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
11
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
12
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
13
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
14
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
15
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
16
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
17
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
18
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
19
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
20
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती

आॅनलाईन परीक्षेसाठी हवे दोन हजार संगणक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 9:24 PM

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकरभरतीची आॅनलाईन परीक्षा घेण्यासाठी एजंसीला किमान दोन हजार संगणक लागणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात संगणक अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्येच उपलब्ध होऊ शकतात.

ठळक मुद्देजिल्हा बँक नोकरभरती : अभियांत्रिकी परीक्षांवर नजर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकरभरतीची आॅनलाईन परीक्षा घेण्यासाठी एजंसीला किमान दोन हजार संगणक लागणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात संगणक अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्येच उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे अभियांत्रिकी परीक्षा संपल्यानंतरच बँकेची नोकरभरती मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १३३ लिपिक व १४ शिपाई अशा १४७ जागांसाठी नोकरभरती घेतली जात आहे. अमरावतीच्या एका एजंसीला या भरतीचे कंत्राट देण्यात आले आहे. आॅनलाईन पद्धतीने ही नोकरभरती परीक्षा घेतली जाणार आहे. १४७ जागांसाठी सात हजारांवर उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. या अर्जांची एजंसीमार्फत छाननी केली जाणार आहे. अर्जांची संख्या पाहता आॅनलाईन परीक्षेचे नियोजन केले जात आहे. या परीक्षेसाठी एका वेळी किमान दोन हजार संगणक लागणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात संगणक केवळ अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये उपलब्ध होऊ शकतात. परंतु तेथे परीक्षा सुरू आहे. त्यामुळे मे अखेरीस किंवा जूनमध्ये परीक्षेनंतर हे संगणक आॅनलाईन परीक्षेसाठी एजंसीला उपलब्ध करून दिले जाऊ शकतात. या संगणकाच्या उपलब्धतेवर परीक्षा केंद्र किती हे अवलंबून राहणार आहे. ही परीक्षा एका दिवसात घ्यायची की दोन दिवसात, किती बॅचमध्ये घ्यायची याचा निर्णय संगणकाच्या उपलब्धतेवर एजंसी घेणार आहे. परीक्षा केंद्रासाठी एकावेळी किमान ४०० संगणक उपलब्ध होणे एजंसीला अपेक्षित आहे. एकूणच नोकरभरतीच्या आॅनलाईन परीक्षेसाठी जून महिना उजाडण्याची चिन्हे आहेत. सात हजारांपैकी काही अर्ज छानणीत बाद होण्याची शक्यता आहे.न्यायालयातील सुनावणी २५ जूनलाजिल्हा बँकेच्या नोकरभरतीत शासनाच्या नियमानुसार आरक्षण लागू करावे, अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे. बँक आरक्षण लागू नसल्याबाबत शासनाचा निर्णय व सर्वोच्च न्यायालयाचा आदेश पुढे करीत आहे. शासनाचे भागभांडवल नसलेल्या कोणत्याही सहकारी संस्थेला नोकरभरतीत आरक्षण लागू होणार नाही, असा शासन निर्णय असल्याचे बँक सांगते आहे. दरम्यान या प्रकरणात नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. न्यायालयाने भरती प्रक्रिया राबवा मात्र या केसच्या निकालापर्यंत नियुक्ती आदेश देऊ नका, असा अंतरिम आदेश जारी केला आहे. या प्रकरणात शासनाची बाजू ऐकून घेतली जाणार आहे. २५ जूनला या प्रकरणी पुढील सुनावणी होणार असल्याचे बँकेच्यावतीने सांगण्यात आले.संचालकांची मोर्चेबांधणी मात्र सुरूचनोकरभरतीच्या आॅनलाईन परीक्षेला जून महिना उजाडणार असला तरी अनेक संचालकांची ‘कोटा’ पूर्ण करण्यासाठी फिल्डींग कायम आहे. एक-दोन संचालकांनी आपल्या क्षमतेच्या बाहेर अनेक उमेदवारांचे ‘टोकण’ घेऊन ठेवल्याचे कळताच इतरांनीही त्या दृष्टीने मोर्चेबांधणी चालविल्याचे बोलले जाते. संचालकांना एक-दोन जागांचा ‘कोटा’ मिळणार असला तरी प्रत्यक्षात काहींनी पाच ते सात जणांना गुंतवून ठेवले आहे. अर्थात त्यांचा बिनव्याजी पैसा वापरला जात आहे. ‘अ‍ॅप्रोच’ होणाऱ्या प्रत्येकालाच ‘तुझे काम होऊन जाईल’, असा शब्द देऊन टोकण ताब्यात घेतले जात आहे. खुला व्यवहार होत असताना सहकार व जिल्हा प्रशासन मात्र मूग गिळून असल्याने आश्चर्य व्यक्त होते.

टॅग्स :bankबँकYavatmalयवतमाळ