शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

सुसाट वाहनाने ठोकरल्याने दुभाजकावर गप्पा मारत बसलेल्या दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2022 05:00 IST

घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली. पोलीसही पोहोचले. वाहन चालक कुणाल देवराव नाखले याला ताब्यात घेण्यात आले. हा चालक दारू पिऊन असल्याचे आढळले. प्रवीण बनसोड व दिनेश निकोडे हे दोघेही मित्र सुस्वभावी होते. ते रोज रात्री नित्य नेमाणे फिरायला जात होते. मात्र, गुरुवारी ते बराच उशीर होऊनही परत न आल्याने कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रवीण बनसोडे हा झेरॉक्स सेंटर चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. 

लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : रात्रीचे जेवण आटोपून फिरायला गेलेल्या दोन युवकांंना भरधाव वाहनाने चिरडले. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री १० वाजता येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६१ वर घडली. प्रवीण श्रीराम बनसोड (४०) आणि दिनेश जयराम निकोडे (४२) दोघेही रा.इंदिरानगर राळेगाव अशी मृतांची नावे आहे. हे दोघेही गुरुवारी रात्री फिरून आल्यानंतर रस्त्यावरील दुभाजकावर गोष्टी सांगत बसले होते. त्यावेळी सुसाट वेगात आलेले वाहन (एमएच-३४-एए-७८४८) त्या दुभाजकावर धडकले. त्यात या दोन्ही युवकांचा मृत्यू झाला. घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली. पोलीसही पोहोचले. वाहन चालक कुणाल देवराव नाखले याला ताब्यात घेण्यात आले. हा चालक दारू पिऊन असल्याचे आढळले. प्रवीण बनसोड व दिनेश निकोडे हे दोघेही मित्र सुस्वभावी होते. ते रोज रात्री नित्य नेमाणे फिरायला जात होते. मात्र, गुरुवारी ते बराच उशीर होऊनही परत न आल्याने कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रवीण बनसोडे हा झेरॉक्स सेंटर चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. कर्ता मुलगा गेल्याने त्याची आई सुशीला, भाऊ योगेश, पत्नी प्रीती, मुली स्पर्शिका व प्रियांशी हे कुटुंब उघड्यावर आले आहे, तर दिनेश निकोडे याच्यामागे पत्नी वनिता, मुलगा किरण, तुषार असा संसार आहे. 

महामार्ग ठरला मृत्यूचा सापळा - शहरातून जाणारा हा राष्ट्रीय महामार्ग सतत अपघातांना निमंत्रण देणारा सापळा ठरत आहे. यापूर्वीही येथे अनेक मृत्यू झाले. चारपदरी रोड असताना स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्याचे रुंदीकरण होऊ दिले नाही, असा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे. दरम्यान, व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून या प्रकाराचा निषेध नोंदविला. -सहायक पोलीस निरीक्षक मोहन पाटील यांनी वाहन चालक कुणाल नाखले याच्यावर गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. राष्ट्रीय महामार्ग शहरातून जात असल्याने तेथे वाहनांची वर्दळ वाढली आहे. शहरातील अंतर्गत वाहतुकीचाही त्यावर भार वाढला आहे. मात्र या महामार्गावर पायदळ फिरणाऱ्यांनी काळजी घेण्याचे गरज निर्माण झाली आहे. 

 

टॅग्स :Accidentअपघात