शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

बारावीचा निकाल साडेचार टक्क्यांनी घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2022 05:00 IST

कोरोनाच्या प्रादुर्भाव काहीसा ओसरल्यानंतर यंदा बारावी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने पार पडली होती. या परीक्षेसाठी १७  हजार ९६४ विद्यार्थी आणि १५ हजार ८०० विद्यार्थिनी अशा एकूण ३३ हजार ७६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. मात्र त्यातील ३३ हजार ४४६ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. यामध्ये १७ हजार ८०४ विद्यार्थ्यांपैकी १६ हजार ८३६ विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण झाले. तर १५ हजार ६४२ पैकी १४ हजार ९८४ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : इयत्ता बारावीचा निकाल बुधवारी दुपारी ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला. यंदाच्या निकालात यवतमाळ जिल्हा पिछाडीवर पडल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील एकूण ३३ हजार ४४६ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यातील ३१ हजार ८२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्ह्याचा निकाल ९५.१३ टक्के इतका लागला आहे. मागील वर्षी हाच निकाल ९९.७७ टक्के इतका होता. कोरोनाच्या प्रादुर्भाव काहीसा ओसरल्यानंतर यंदा बारावी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने पार पडली होती. या परीक्षेसाठी १७  हजार ९६४ विद्यार्थी आणि १५ हजार ८०० विद्यार्थिनी अशा एकूण ३३ हजार ७६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. मात्र त्यातील ३३ हजार ४४६ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. यामध्ये १७ हजार ८०४ विद्यार्थ्यांपैकी १६ हजार ८३६ विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण झाले. तर १५ हजार ६४२ पैकी १४ हजार ९८४ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. यामध्ये मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९४.५६ टक्के तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९५.७९ टक्के इतके आहे. तालुकानिहाय बारावी निकालाची आकडेवारी पाहिली असता जिल्ह्यात सर्वाधिक ९८.०५ टक्के निकाल महागाव तालुक्याचा लागला आहे. तर सर्वात कमी म्हणजे ८६.७१ टक्के निकाल वणी तालुक्याचा लागला आहे. वणी तालुक्याची शैक्षणिक घसरण चिंता वाढविणारी आहे. मागील वर्षी वणी तालुक्याचा बारावीचा निकाल १०० टक्के इतका लागला होता. यवतमाळ तालुक्याचा निकाल ९६.१८ टक्के, नेर तालुका ९६.२४, दारव्हा ९०.८२, दिग्रस ९५.८८, आर्णी ९७.८५, पुसद ९७.०७, उमरखेड ९७.५७, महागाव ९८.०५, बाभूळगाव ९७.१३, कळंब ९४.२७, राळेगाव ९५.२५, मारेगाव ९२.४१, पांढरकवडा ९४.२६, झरी जामणी ९५.२७ तर घाटंजी तालुक्याचा निकाल ९१.९६ टक्के इतका लागला आहे. मुलांच्या तुलनेत यंदाही मुलींनीच बाजी मारल्याचे दिसले. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९४.५६ टक्के तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९५.७९ टक्के आहे. 

मागील वर्षी लागला होता ९९.७७ टक्के निकाल इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल यंदा ९५.१३ टक्के लागला आहे. मागील वर्षी हाच निकाल ९९.७७ टक्के इतका होता. मागील वर्षीच्या निकालाची तुलना केली असता यंदाच्या निकालात साधारण साडेचार टक्क्यांची घसरण दिसून येते. मागील वर्षी यवतमाळ तालुक्याचा ९९.८२ टक्के होता. बाभूळगाव १००, नेर ९९.६८, दारव्हा ९९.५८, दिग्रस ९९.६१, आर्णी ९९.१३, पुसद ९९.७५, उमरखेड ९९.६९, महागाव ९९.८१, कळंब ९९.८१, राळेगाव ९९.०३, मारेगाव १००, पांढरकवडा १००, झरी १००, वणी १०० तर घाटंजी तालुक्याचा ९६.६२ टक्के इतका निकाल लागला होता. 

रिपीटर विद्यार्थ्यांचा ६०.०८ टक्के निकाल- रिपीटर असलेल्या ७३९ विद्यार्थ्यांनी यंदा बारावीची परीक्षा दिली हाेती. त्यातील ३२७ मुले आणि ११७ मुली असे ४४४ जण उत्तीर्ण झाले असून रिपीटर विद्यार्थ्यांचा निकाल ६०.०८ टक्के इतका आहे. यामध्ये मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ६२.१६ टक्के तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ५४.९२ टक्के इतके आहे. 

निकाल समाधानकारक- यंदाच्या बारावी निकालात साडेचार टक्क्यांची घट दिसत असली तरी मागील वर्षी अंतर्गत मूल्यमापनाचे मार्क असल्याने निकाल फुगलेला होता. यावेळी मात्र ऑफलाईन परीक्षा झाली. 

 

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालEducationशिक्षण