शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

बांगरनगर खुनामागे क्षुल्लक वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 05:00 IST

सागर नारायण भुते (२७) रा. बुटले ले-आऊट पिंपळगाव असे मृताचे नाव आहे. सागर हा मंगळवारी दुपारी अक्षय पिलारे या मित्रासोबत फिरत होता. त्याच्या दुचाकीचा सनकी उर्फ विवेक कांबळे याच्या दुचाकीला कट लागला. यातून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर सागर घरी परत आला. त्याला सनकीने फोन करून वाद मिटवायला बोलाविले. सायंकाळी सागर झालेला वाद मिटवून टाकण्याच्या उद्देशाने बांगरनगरातील साई किराणा समोर पोहोचला.

ठळक मुद्देएकाला अटक : तिघे पसार, दुचाकीचा कट लागल्याचे कारण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मंगळवारी सायंकाळी बांगरनगर येथे सागर भुते या तरुणाच्या झालेल्या खुनामागे दुचाकीचा लागलेला कट एवढे क्षुल्लक कारण असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. क्षणिक रागातून उद्भवलेल्या भांडणात एका तरुणाचा बळी गेला.सागर नारायण भुते (२७) रा. बुटले ले-आऊट पिंपळगाव असे मृताचे नाव आहे. सागर हा मंगळवारी दुपारी अक्षय पिलारे या मित्रासोबत फिरत होता. त्याच्या दुचाकीचा सनकी उर्फ विवेक कांबळे याच्या दुचाकीला कट लागला. यातून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर सागर घरी परत आला. त्याला सनकीने फोन करून वाद मिटवायला बोलाविले. सायंकाळी सागर झालेला वाद मिटवून टाकण्याच्या उद्देशाने बांगरनगरातील साई किराणा समोर पोहोचला. तेथे सनकी उर्फ विवेक कांबळे (१९), पवन पाईकराव (२४) दोघे रा. वाघापूर झोपडपट्टी, आयुष पंचभाई, योगेश वाघ (२१) दोघे रा. बांगरनगर हे उपस्थित होते. वाद मिटविण्यासाठी आलेल्या सागरशी शाब्दीक बाचाबाची करीत सनकी व त्याच्या साथीदारांनी धारदार शस्त्र व दगडांनी हल्ला चढविला. यात सागर गंभीर जखमी झाला. आरोपी तेथून पसार झाले. अक्षय पिलारे व रजत शर्मा या दोघांनी जखमी सागरला शासकीय रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती अक्षयने सागरची आई मनोरमा भुते यांना दिली. सागरची आई मनोरमा भुते यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पवन पाईकराव याला अटक केली. तर इतर तीन आरोपी पसार झाले आहेत.आरोपी पवन पोलीस दप्तरी कुख्यातदुचाकीचा कट लागल्यावरून झालेल्या वादात थेट जीवघेणा हल्ला आरोपींनी केला. यावरून या गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक नसल्याचे दिसून येते. त्यातील पवन पाईकराव हा पोलीस रेकॉर्डवर कुख्यात आरोपी असल्याची नोंद आहे.

टॅग्स :Murderखून