शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

हिवराच्या व्यापाऱ्याला पावणेदोन लाखांचा गंडा

By admin | Updated: November 5, 2016 00:18 IST

मोबाईल कॉल करून अनेकांना गंडा घालण्याचे प्रकार उघडकीस येत असतानाच महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथील एका कृषी केंद्र व्यावसायिकाला दिल्ली

कर्जाचे आमीष : दिल्लीवरून मोबाईल कॉलहिवरासंगम : मोबाईल कॉल करून अनेकांना गंडा घालण्याचे प्रकार उघडकीस येत असतानाच महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथील एका कृषी केंद्र व्यावसायिकाला दिल्ली येथील ठगाने कर्जाचे आमिष देवून पावणेदोन लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार पुढे आला. या प्रकरणी महागाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विलास दिगांबर करमोडकर रा.हिवरासंगम असे फसविल्या गेलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. विलासच्या मोबाईलव १५ जुलै २०१५ रोजी एक कॉल आला. लाईफ इन्शुरन्स कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. तुम्हाला कंपनीकडून चार टक्के दराने कर्ज उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. विलासने संबंधिताला नाव विचारले असता दीपनारायण अवस्थी असे सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून दहा लाख रुपयांच्या कर्जाची मागणी विलास करमोडकर यांनी केली. त्यावर संबंधित व्यक्तीने यासाठी दहा टक्के रक्कम बँकेत भरावे लागेल, असे सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून विलासने २९ आॅगस्ट २०१५ रोजी एक लाख रुपयांचा धनादेश संबंधिताने दिलेल्या खात्यात वळता केला. मात्र कर्जप्रकरण पुढे सरकले नाही. विलास कर्जाची प्रतीक्षा करीत असताना २० सप्टेंबर रोजी पुन्हा कॉल आला. त्यावेळी कर्ज तत्काळ हवे असल्यास आठ टक्के रक्कम भरा, २४ तासात कर्ज मिळेल, असे सांगितले. यावेळी रवींद्रसिंग राजपुत असे संबंधित व्यक्तीने आपले नाव सांगितले. एक लाख रुपये दिल्यानंतर कर्जाच्या आशेने विलासने पुन्हा २३ सप्टेंबर २०१५ रोजी ८० हजार रुपयांचा धनादेश संबंधिताच्या खात्यात जमा केला. मात्र यानंतर आलेल्या फोनवर चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता फोन बंद येत असल्याचा अनुभव आला. आपली फसवणूक तर झाली नाही ना, अशी शंका येवू लागली. याबाबत त्यांनी विविध ठिकाणी चौकशी केली. परंतु उपयोग झाला नाही. अखेर विलास करमोरकर यांनी महागाव पोलीस ठाण्यात गुरुवारी धाव घेतली आणि तक्रार दिली. त्यावरून महागाव पोलिसांनी दीपनारायण अवस्थीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)