शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
4
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
5
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
6
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
7
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
8
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
9
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
10
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
11
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
12
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
13
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
14
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
15
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
16
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
17
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
18
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
19
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
20
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून बदल्यांचा रतीब

By admin | Updated: May 18, 2014 23:55 IST

जिल्हा परिषदेत पुुन्हा एकदा बदल्यांचा रतीब सुरू झाला आहे. सोमवार १९ ते २३ मे दरम्यान समुपदेशनाने प्रशासकीय बदल्या केल्या जाणर आहे.

 यवतमाळ : जिल्हा परिषदेत पुुन्हा एकदा बदल्यांचा रतीब सुरू झाला आहे. सोमवार १९ ते २३ मे दरम्यान समुपदेशनाने प्रशासकीय बदल्या केल्या जाणर आहे. शिक्षण विभाग सोडून सर्वच विभागात हिच प्रक्रिया राबविणार आहे. पहिल्या दिवशी बांधकाम, पाणीपुरवठा, सिंचन आणि महिला व बालकल्याण विभागातील कर्मचार्‍यांचे समुपदेशन केले जाणार आहे. त्यानंतर २१ मे रोजी सामान्य प्रशासन, पंचायत विभागाची प्रकिया आहे. २२ मे रोजी आरोग्य, २३ मे रोजी कृषी, पशुसंवर्धन आणि वित्त विभागातील कर्मचार्‍यांच्या बदल्या केल्या जाणार आहे. ज्या कर्मचार्‍यांना दहा वर्ष पूर्ण झाले त्यांचीच प्रशासकीय बदली केली जाणार आहे. या नियमामुळे बोटावर मोजण्याइतकेच कर्मचारी बदलीस पात्र ठरले आहे. काही विभागामध्ये एकही बदली पात्र कर्मचारी नाही. आदिवासी बहूल आणि नक्षलग्रस्त भागातील कर्मचार्‍यांची सलग तीन वर्ष सेवा झाल्यानंतर विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार आहे. याशिवाय अर्ध्यांगवायू, अपंग कर्मचारी, मतिमंद मुलाचे पालक, हृदय शस्त्रक्रिया झालेले कर्मचारी, जन्मापासून मुत्रपिंडाचा आजार जडलेले, कॅन्सर रुग्ण, विधवा, कुमारीका, परित्यक्ता - घटस्फोटीत महिला, पती-पत्नी एकत्रिकरण आणि ५३ वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचार्‍यांना विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार आहे. प्रशासकीय बदलीतून आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील रिक्तपदे प्राधान्याने भरण्याचे निर्देश आहेत. जिल्हा परिषदेतील जवळपास सर्वच विभागातील बदली प्रक्रिया २५ मेच्या आत पूर्ण होणार आहे. मात्र शिक्षण विभागाकडे बदली पात्र शिक्षकांचा अधिकृत आकडला आलेला नाही. पंचायत समितीस्तरावर शिक्षकांचे समायोजन झाले आहे. त्यानंतर जिल्हास्तरावरचे समायोजन अजूनही व्हायाचे आहे. समायोजनच झाले नसल्यामुळे शिक्षकांची बदली प्रक्रिया अधांतरी आहे. २५ मेच्या आत समायोजन करून बदली प्रक्रिया करण्याचे आव्हान आहे. मुळात ही प्रक्रिया होवूू नये, यासाठी काही घटक सक्रिय झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्यालयी प्रतिनियुक्तीवर ठाण मांडूण असलेल्याचाही मुख्यकार्यकारी अधिकारी केव्हा समाचार घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बदली प्रक्रिया नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने वादग्रस्त ठरते. अनियमितता टाळण्यासाठी सीईओंनी विभाग प्रमुखांची बैठक घेवूून अगाऊ सुचना दिल्या आहेत. याचे कितपत पालन होते, हे प्रत्यक्ष प्रक्रियेतूनच दिसणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)