शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

कालमर्यादेत कामे व्हावी

By admin | Updated: August 28, 2015 02:37 IST

पश्चिम विदर्भातील सर्वात मोठा व महत्त्वाकांक्षी बेंबळा सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण व्हावा, यासाठी सर्व संबंधितांची जबाबदारी निश्चित करण्याची गरज आहे.

बेंबळा प्रकल्प : अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित कराके.एस. वर्मा  राळेगावपश्चिम विदर्भातील सर्वात मोठा व महत्त्वाकांक्षी बेंबळा सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण व्हावा, यासाठी सर्व संबंधितांची जबाबदारी निश्चित करण्याची गरज आहे. त्याचबरोबर या प्रकल्पाला झालेला विलंब, मुख्य कालवे, उपकालवे बांधण्यात झालेल्या चुका, गैरप्रकार यातील दोषींचा शोध घेऊन कारवाई करण्याचीही आवश्यकता आहे. आतापर्यंत झालेल्या खर्चाची आॅडिट करावे, अशीही मागणी होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुक्रवारच्या जिल्हा दौऱ्यात शेतकऱ्यांच्या या अपेक्षांची दखल घेतल्या जावी, अशी प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे. ७५ टक्के पूर्ण झालेल्या प्रकल्पाचे काम पुढील तीन वर्षात वेगाने पूर्ण करण्याचे धोरण शासनाने जाहीर केले आहे. बेंबळा धरण पाच वर्षापूर्वीच पूर्ण झाले. कालव्याची कामे ८० टक्के पूर्ण झाली असल्याचा या विभागाचा दावा आहे. त्यामुळे उर्वरित कामे लवकर पूर्ण व्हावी. बेंबळा प्रकल्पामुळे राळेगाव, कळंब, बाभूळगाव, मारेगाव या चार तालुक्यातील १७७ गावांतील १९ हजार शेतकऱ्यांचे ५३ हजार हेक्टर सिंचनाचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. त्यातील ७५ टक्के प्रत्यक्षात साध्य होऊन किमान ४० हजार हेक्टर क्षेत्रात तरी ओलित होईल, अशी अपेक्षा होती. आज पाच वर्षानंतरही पाच-सहा हजार हेक्टर क्षेत्रात सिंचन पूर्ण क्षमतेने होत नाही. ८० च्या दशकात कै.शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना या प्रकल्पाची कोनशीला बसविण्यात आली होती. ३५ पेक्षा अधिक वर्षे होवूनही प्रकल्प रखडलेला आहे. त्यावेळी केवळ ५० कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. आता दोन हजार २०० कोटी रुपये खर्च होऊनही शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ होवू शकला नाही. अधिकारी, राजकारणी, ठेकेदार मात्र मालामाल झाले. शेतकऱ्यांची मात्र तिसरी पिढीही लाभाच्या प्रतीक्षेतच आहे. उपवितरिका शेतकऱ्यांच्या जीवावरधरणापासून सात किलोमीटर अंतरावर मुख्य कालव्याच्या भिंतीचे सिमेंट काँक्रीटचे काम झालेले नाही. मुख्य कालव्यात अनेक ठिकाणी मातीचे, मुरूमाचे ढिगारे आहेत. काही ठिकाणी वृक्ष आहेत. उजव्या कालव्याची लांबी ११३ कि़मी. आहे. त्यात ४३ कि़मी.पर्यंत कामे पूर्ण झाली असल्याचे व ५० कि़मी. लांबीपर्यंत सिंचनाचे पाणी पोहोचते, असा दावा विभागाचा आहे. मात्र वरील अडथळ्यामुळे या दाव्यावर प्रश्नचिन्ह आहे. कोपरा जानकर या गावाचे नागरिक ओलसरपणामुळे जीव मुठीत धरून जगत आहे. कळंब तालुक्यातील आष्टी वितरिका, राळेगाव तालुक्यातील सावरगाव-आष्टा उपवितरिकेच्या बोगस कामामुळे आजूबाजूच्या शेतात पाणी पाझरत आहे. तेथील शेती पडिक राहते. लांब अंतरांपर्यंत पाणीच पोहोतच नाही, अशा अनेक तक्रारी आहेत. त्याबाबत निश्चित धोरण ठरवून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे.