शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळा कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ

By admin | Updated: May 22, 2014 01:31 IST

जिल्ह्यातील ५९ विमुक्त जाती भटक्या जमाती आश्रमशाळेतील कर्मचार्‍यांना गेल्या चार महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही.

ढाणकी : जिल्ह्यातील ५९ विमुक्त जाती भटक्या जमाती आश्रमशाळेतील कर्मचार्‍यांना गेल्या चार महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यामुळे या शाळातील कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

जिल्ह्यात समाजकल्याण विभागातर्फे विमुक्त जाती-भटक्या जमातीतील मुला-मुलींसाठी आश्रमशाळा चालविल्या जातात. प्राथमिक ३७ आणि माध्यमिक २२ अशा ५९ आश्रमशाळा जिल्ह्यात आहेत. या आश्रमशाळेत मुख्याध्यापक, शिक्षक, लिपिक, सेवक, स्वयंपाकी, कामठी, अधीक्षक असे शेकडो कर्मचारी कार्यरत आहेत. परंतु या कर्मचार्‍यांना फेब्रुवारी २0१४ पासून पगारच मिळालेला नाही. त्यामुळे या कर्मचार्‍यांवर आर्थिक संकट ओढवले आहे.

या आश्रमशाळांतील कर्मचार्‍याचे पगार विशेष समाज कल्याण अधिकार्‍यांकडून होतात. कर्मचार्‍यांच्या पगारासाठी ‘ग्रॅन्ट’ नसल्याने पगार झाले नाहीत. या महिन्यात पगारासाठी एक कोटी रुपये प्राप्त झाले. परंतु थकीत पगाराची रक्कम यापेक्षा कितीतरी अधिक आहे. पगारासाठी निधीची तरतूद नसल्यास ‘मायनस’ मधून पगार काढण्यात येतात. परंतु तसे करण्यास समाजकल्याण विभागाच्या संचालकांनी संमती दिली नाही. त्यामुळे आश्रमशाळातील शेकडो कर्मचार्‍यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

आश्रमशाळातील कर्मचार्‍यांनी विविध बँका, पतसंस्थांकडून घरबांधणी, मुलांचे शिक्षण, आजारपण, लग्नकार्य इत्यादीसाठी कज्रे काढली आहेत. चार-चार महिने होत नसल्याने या कर्मचार्‍यांना व्याजाचा भूर्दंड विनाकारण सहन करावा लागत आहे. याशिवाय विम्याचे हप्ते थकीत झाल्याने एखादी अनुचित घटना घडल्यास विम्याच्या लाभापासून वंचित होण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. आश्रमशाळा कर्मचार्‍यांना अनियमित पगाराला वारंवार तोंड द्यावे लागते हे विशेष.

चार महिन्याच्या थकीत पगाराबाबत समाजकल्याण अधिकार्‍यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ते पुण्याला असल्याचे समजले. ‘मायनस’ मधून पगार करण्याचा आदेश निघाल्याचे परंतु अद्याप यवतमाळ समाज कल्याण विभागास प्राप्त न झाल्याचे एका अधिकार्‍याने सांगितले. (वार्ताहर)