शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

‘मास्क’साठी तीन यंत्रणा रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2022 05:00 IST

जिल्ह्यात कोरोना पाॅझिटिव्ह असलेल्या रुग्णांची संख्या ५०वर पोहोचली आहे. संसर्ग वाढत असताना प्रत्येक नागरिकाने वैयक्तिक जबाबदारी म्हणून सुरक्षा साधनांचा वापर करणे अपेक्षित आहे. तसे आवाहनही विविध स्तरावरून केले जाते. मात्र, कारवाई केल्याशिवाय जुमानणार नाही, अशीच स्थिती आहे. त्यामुळेच जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या निर्देशावरून थेट कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना विषाणू संसर्गाची तिसरी लाट धडकली आहे. महानगरांमध्ये हजारोंच्या संख्येत रुग्ण सापडत आहेत. यवतमाळ शहर व जिल्ह्यातही रुग्ण वाढत आहेत. असे असले तरी सुरक्षा नियमांचे पालन केले जात नाही. गर्दीत वावरणे, मास्कचा वापर न करणे सुरूच आहे. पुन्हा कठोर नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी महसूल, पोलीस व नगर परिषदेची यंत्रणा रस्त्यावर उतरली आहे. यवतमाळमधील मुख्य बाजारपेठेत गुरुवारी मास्क नसलेल्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. जिल्ह्यात कोरोना पाॅझिटिव्ह असलेल्या रुग्णांची संख्या ५०वर पोहोचली आहे. संसर्ग वाढत असताना प्रत्येक नागरिकाने वैयक्तिक जबाबदारी म्हणून सुरक्षा साधनांचा वापर करणे अपेक्षित आहे. तसे आवाहनही विविध स्तरावरून केले जाते. मात्र, कारवाई केल्याशिवाय जुमानणार नाही, अशीच स्थिती आहे. त्यामुळेच जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या निर्देशावरून थेट कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. यवतमाळ शहरात उपविभागीय अधिकारी अनिरूद्ध बक्षी, तहसीलदार कुणाल झाल्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले, शहर ठाणेदार नंदकुमार पंत, अवधूतवाडी ठाणेदार मनोज केदारे यांच्यासह तीनही विभागांचे कर्मचारी रस्त्यांवर फिरत होते. विनामास्क दिसणाऱ्या व्यक्तीला ५०० रुपये दंडाची पावती दिली जात होती. व्यावसायिकांनाही दुकाने उघडी ठेवण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना मास्कची सक्ती करा, त्याशिवाय वस्तू देऊ नका, अशी ताकीद देण्यात आली. दुकानात गर्दी झाल्यास व मास्क न दिसल्यास थेट दुकानदारावरही दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.  कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी मास्क, सॅनिटायझर,  शारीरिक अंतर राखणे व लसीकरण या चतु:सूत्रीचा प्रत्येकाने अवलंब करणे गरजेचे आहे. काही लक्षणे वाटल्यास तत्काळ कोरोनाची तपासणी करावी, जेणेकरून कुटुंबासह इतरांना संसर्गापासून दूर ठेवता येईल.

अडीच तासात ११००० दंड वसूल

मास्क न लावता शहरात फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. गुरुवारी ११.३० वाजता ही मोहीम सुरू झाली. दुपारी २ वाजेपर्यंत २२ जणांकडून ११ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. आता ही मोहीम नियमित राबविली जाणार आहे. सार्वजनिक आरोग्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कठोर उपाययोजना राबविण्याच्या तयारीत आहे.

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस