दोन शिवसैनिकांसह तिघांना मारहाण

By Admin | Updated: September 15, 2014 00:23 IST2014-09-15T00:23:45+5:302014-09-15T00:23:45+5:30

क्षुल्लक कारणावरून वाद घालून एका बियाणे कंपनीच्या मद्यधुंद प्रतिनिधींनी दोन शिवसैनिकांसह तिघांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यामध्ये दोघेजण गंभीर तर एक जण

Three Shiv Sena activists including three | दोन शिवसैनिकांसह तिघांना मारहाण

दोन शिवसैनिकांसह तिघांना मारहाण

यवतमाळ : क्षुल्लक कारणावरून वाद घालून एका बियाणे कंपनीच्या मद्यधुंद प्रतिनिधींनी दोन शिवसैनिकांसह तिघांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यामध्ये दोघेजण गंभीर तर एक जण किरकोळ जखमी झाला. ही घटना येथील दारव्हा मार्गावरील एका हॉटेलमध्ये शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.
शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख हरीहर लिंगनवार, गणेश बयास दोघेही रा. यवतमाळ अशी गंभीर जखमींची नावे आहे. युवा सेनेचे जिल्हा प्रमुख गजानन बेजंकीवार रा. पांढरकवडा हे किरकोळ जखमी झाले. तर संजय रामराव मस्के, महेश विश्वनाथ गवई, राहूल सुरेंद्रसिंग, प्रशांत रामकृष्ण देशमुख, नीलेश पुंडलिक वानखेडे, रोहित भरतसिंग राणा अशी अटकेतील मारहाण करणाऱ्यांची नावे आहे. उपजिल्हा प्रमुख लिंगनवार यांच्यासह संबंधित तिघेजण दारव्हा मार्गावरील हॉटेलमध्ये रूम बुक करण्यासाठी गेले होते. यावेळी कॉकटेल पार्टीत एका बियाणे कंपनीच्या मद्यधुंद झालेल्या संबंधित प्रतिनिधींनी वाद घालून त्यांना मारहाण केली. तसेच लिंगनवार यांची १० हजार रूपये किमतीची सोन्याची साखळी, मोबाईल आणि २५ हजार रोख असा एकूण ५२ हजार रूपयांचा मुद्देमाल लुटून नेला. घटनेची माहिती मिळताच फौजदार प्रितेश राऊत यांनी तेथे धाव घेवून संबंधितांना अटक केली. घटनेनंतर आमदार संजय राठोड, निवासी उपजिल्हा प्रमुख प्रवीण पांडे आणि शिवसैनिक ठाण्यात दाखल झाले होते. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Three Shiv Sena activists including three