तीन महिन्यांचा धान्यसाठा नेरमध्ये पोहोचलाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 05:00 AM2020-04-09T05:00:00+5:302020-04-09T05:01:06+5:30

प्रत्यक्षात नेर तालुक्यात केवळ एक महिन्याचाच धान्य माल दाखल झाला आहे. पुढील दोन महिन्यांच्या धान्यासाठी गरजूंना पुन्हा रांगेत राहावे लागणार आहे. शिवाय किराणा साहित्य खरेदीसाठी पैशांची तडजोड करण्याचा प्रश्न आहे. विविध सामाजिक संस्था, संघटनांच्या माध्यमातून जेवण, रेशन मिळत असले तरी किराणा वस्तू कशा खरेदी करायच्या याची चिंता गरिबांना आहे.

Three months' worth of grain has not reached Nair | तीन महिन्यांचा धान्यसाठा नेरमध्ये पोहोचलाच नाही

तीन महिन्यांचा धान्यसाठा नेरमध्ये पोहोचलाच नाही

Next
ठळक मुद्देकामे नसल्याने पैसा थांबला : किराणा साहित्य खरेदीचा प्रश्न कायम

लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : कोरोनाच्या दहशतीमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनने अनेकांचा लहान-मोठा व्यवसाय बंद झाला. विविध प्रतिष्ठानांमध्ये काम करणाऱ्या लोकांपुढे रोजगाराचा प्रश्न उभा ठाकला. अशा परिस्थितीत त्यांचे जेवणाचे वांदे होऊ नये म्हणून स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून तीन महिन्यांचा धान्यसाठा देण्याची घोषणा शासनाने केली.
प्रत्यक्षात नेर तालुक्यात केवळ एक महिन्याचाच धान्य माल दाखल झाला आहे. पुढील दोन महिन्यांच्या धान्यासाठी गरजूंना पुन्हा रांगेत राहावे लागणार आहे. शिवाय किराणा साहित्य खरेदीसाठी पैशांची तडजोड करण्याचा प्रश्न आहे. विविध सामाजिक संस्था, संघटनांच्या माध्यमातून जेवण, रेशन मिळत असले तरी किराणा वस्तू कशा खरेदी करायच्या याची चिंता गरिबांना आहे.
रेशन दुकानातून एक महिन्याचे धान्य वाटप केले जाणार आहे. मात्र ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही असे नागरिक या लाभापासून वंचित राहणार आहे. याचा सर्वाधिक फटका तालुक्यात असलेल्या फासेपारधी व भटक्या समाजाच्या लोकांना बसणार आहे. रोजगार सुरू होईपर्यंत त्यांना सकाळ-संध्याकाळ कुणाच्या तरी मदतीचीच प्रतीक्षा करावी लागणार आहे. रेशनकार्डधारकांना टप्प्या-टप्प्याने धान्य वाटप केले जाणार असल्याचे सांगितले जाते.
पारधी समाजातील अनेक कुटुंबाकडे रेशनकार्ड नाही. एकट्या आजंती पारधी बेड्यावरील ३५ पैकी १२ कुटुंबांकडे कार्ड नाही. त्यामुळे या कुटुंबाला रेशनचे धान्य मिळणार नाही. यातील काही कुटुंब घरोघरी फिरून मिळालेल्या अन्नाद्वारे पोट भरतात. काही शिकार करतात. आता या दोनही सोयी थांबल्या आहे. अशीच काहिशी परिस्थिती रोजगार नसलेल्या लोकांची आहे. अशावेळी त्यांना रेशनचे पूर्ण धान्य मिळणे अपेक्षित आहे.

ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही त्यांना धान्य वाटपासंदर्भात कुठलाही आदेश नाही. यामुळे नियमित रेशनकार्डधारकांनाच धान्य वाटप होईल.
- राजेंद्र चिंतकुटलावार,
नायब तहसीलदार, नेर

Web Title: Three months' worth of grain has not reached Nair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.