शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिबंधित बियाणे विकणाऱ्या तिघांना केली रंगेहात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2022 05:00 IST

शेखर तानबा झाडे (४९, रा. राम मंदिरजवळ), शुभम रामनाथजी कासारकर (२८, रा. कृष्णापूर), इम्रान नूर मोहंमद थेम (३३, रा. पोलीस स्टेशन मागे, राळेगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून प्रतिबंधित कापूस बीटी बियाण्यांच्या ११ बॅग जप्त करण्यात आल्या. सध्या शेतकरी कापूस लागवडीसाठी प्रयत्न करीत आहेत. शासनाची मान्यता नसलेल्या प्रतिबंधित बीटी बियाण्याची विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई करावी, असे आदेश आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : शहरात प्रतिबंधित बीटी बियाण्यांची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती तालुका कृषी अधिकाऱ्यांना मिळाली. या माहितीची पडताळणी केली. नंतर स्थानिक गुन्हे शाखेतील पथकाच्या मदतीने सापळा रचून तीन आरोपींना बियाणे विकताना रंगेहाथ अटक केली. इतकेच नव्हे तर शेतातील पोल्ट्रीच्या शेडमध्ये दडवून ठेवलेली बियाणीही जप्त केली. ही कारवाई शनिवारी करण्यात आली. शेखर तानबा झाडे (४९, रा. राम मंदिरजवळ), शुभम रामनाथजी कासारकर (२८, रा. कृष्णापूर), इम्रान नूर मोहंमद थेम (३३, रा. पोलीस स्टेशन मागे, राळेगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून प्रतिबंधित कापूस बीटी बियाण्यांच्या ११ बॅग जप्त करण्यात आल्या. सध्या शेतकरी कापूस लागवडीसाठी प्रयत्न करीत आहेत. शासनाची मान्यता नसलेल्या प्रतिबंधित बीटी बियाण्याची विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई करावी, असे आदेश आहेत. बीटी बियाणे विक्री करणाऱ्यांचे रॅकेट उघड करण्यासाठी कृषी विभागाने डमी शेतकरी पाठविला. त्याने राळेगावातील मेटीखेडा रोडवरील रिलिएन्ट शाळेजवळ ७०० रुपये प्रतिपाकीटप्रमाणे शेखर झाडे, इम्रान थेम यांच्याकडून दोन बॅग विकत घेतल्या. याचवेळी सापळा लावून असलेल्या पोलिसांनी झडप घातली. आरोपी शेखर झाडे, शुभम कासारकर यांना दुचाकीसह ताब्यात घेतले. त्यानंतर इम्रान थेम याच्या शेतातील पोल्ट्री शेडची झडती घेतली. तेथे बियाण्याची ११ पाकिटे आढळून आली. पाेलिसांनी आरोपींकडून ७० हजार रुपयांचा माल जप्त केला. याप्रकरणी पर्यावरण संरक्षण अधिनियम, प्रतिबंधित बियाणे विक्री कायदा यानुसार राळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत जिल्हा कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे, नीलेश ढाकूलकर यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक गणेश वनारे, अमोल मुडे, विवेक देशमुख, नीलेश राठोड, किशोर झेंडेकर, सलमान शेख, जितेंद्र चौधरी यांनी सहभाग घेतला.

या बियाण्यातून फसवणूक- प्रतिबंध असलेल्या बियाण्याची उगवण क्षमता राहणार की नाही याची शाश्वती नसते. मागील वर्षीय अनेक शेतकऱ्यांना या बीटी बियाण्यांचा फटका बसला. कृषी विभागाकडून प्रमाणित बियाणे घेण्याचे आवाहन करण्यात आले.

 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्र