शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

ठोकळ, ठाकरे, चव्हाण, खांदवे यांची वर्णी

By admin | Updated: October 3, 2014 02:13 IST

जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतींची गुरूवारी निवड करण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादीकडून सुभाष ठोकळ, लता खांदवे तर कांग्रेसचे नरेंद्र ठाकरे, विमल चव्हाण यांची बहुमताने निवड करण्यात आली.

यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतींची गुरूवारी निवड करण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादीकडून सुभाष ठोकळ, लता खांदवे तर कांग्रेसचे नरेंद्र ठाकरे, विमल चव्हाण यांची बहुमताने निवड करण्यात आली. राज्यातील आघाडीत बिघाडी आल्यानंतरही जिल्हा परिषदेत मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी आणि सेना-भाजपा युती कायम आहे. आचार संहिता असल्याने सभापतींच्या निवड प्रक्रियेनंतर लागलीच खाते वाटप करता येत नाही. त्यामुळे सुभाष ठोकळ आणि नरेंद्र ठाकरे यांचे खाते कोणते हे अजून तरी ठरलेले नाही. याउलट महिला व बाल कल्याण आणि समाज कल्याण समिती ही शासनस्तरावरूनच निर्देशित करण्यात आली आहे. यात महिला बाल कल्याण सभापती म्हणून उमरखेड तालुक्यातील पोफाळी सर्कच्या विमल रमेश चव्हाण यांची तर समाज कल्याण सभापतीपदी वडगाव सर्कलच्या लता खांदवे यांची निवड झाली. या दोन्ही सभापतींविरूद्ध शिवसेनेकडून संगीता इंगोले आणि भाजपाकडून उषा राठोड यांनी नामांकन दाखल केले होते. तर सुभाष ठोकळ यांच्याविरोधात प्रवीण उईके, नरेंद्र ठाकरे यांच्या विरोधात दिवाकर राठोड यांनी नामांकन दाखल केले. या मतदान प्रक्रियेत आघाडीच्या उमेदवारांना ४४ मते मिळाली. युतीच्या उमेदवारांना १६ मते मिळाली. निवड प्रक्रियेला काँग्रेसचे देवानंद पवार आणि भाजपाचे शंकर पांढरे गैरहजर होते. आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर उरलेल्या सहा विभागांपैकी कृषी व पशूसंवर्धन हे दोन विभाग वगळता उर्वरित अर्थ-बांधाकाम, शिक्षण-आरोग्य या चार विभागांची सोयीने जोडतोड करता येणार आहे. तर पाणीपुरवठा आणि स्थायी समितीचा पदसिद्ध सभापती हा जिल्हा परिषद अध्यक्षच राहतो. त्यामुळे आजच्या निवडप्रक्रियेने केवळ दोन समित्यांचे सभापती ठरलेले आहे. उरलेल्या दोन सभापतींकडे कुठल्या समित्या येतात हे सर्वसाधारण सभेनंतरच स्पष्ट होणार आहे. जिल्हा परिषदेतील पदे वाटपात सुरूवातीपासूनच यवतमाळ विधानसभेचा दबदबा राहिला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षातील प्रमुख नेते मंडळी यवतमाळातून निवडणूक लढवित असल्याने ही राजकीय गुंतवणूक करण्यात आली आहे. यापूर्वी यवतमाळ विधानसभेतील सुभाष ठोकळ (राष्ट्रवादी), प्रभाकर उईके (शिवसेना), मनमोहनसिंग चव्हाण (शिवसेना) या तिघांना सभापती पद देण्यात आले होते. आता काँग्रेसने जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद बाळासाहेब मांगूळकर यांना दिले आहे. तर राष्ट्रवादीने सुभाष ठोकळ यांची पुन्हा वर्णी लावली आहे. याशिवाय समाज कल्याण सभापती म्हणून यवतमाळ शहरालगतच्या वडगाव सर्कलमधील लता खांदवे यांना संधी देऊन सोयीचे राजकीय संतुलन राखण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रक्रियेत महागाव तालुक्यातील सदस्यांच्या तोंडाल पाने पुसण्यात आली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)