शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
4
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
5
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
6
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
7
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
8
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
9
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
10
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
11
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
12
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
13
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
14
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
15
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
16
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
17
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
18
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
19
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
20
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
Daily Top 2Weekly Top 5

देव्हाऱ्याखाली होता अवैध दारूचा साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 22:22 IST

शहरातील मुलकी परिसरात राहणाऱ्या पदवीधर युवकाने अवैध दारूविक्रीचा व्यवसाय सुरू केला. त्याने दारूसाठा लपविताना स्वत:चे तांत्रिक कौशल्य लावले. यामुळे जांब वाघाडी येथे सुरू असलेला दारू गुत्ता अनेक वर्षानंतर उजेडात आला.

ठळक मुद्देजांब-वाघाडीतील प्रकार । पदवीधर युवकावर गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील मुलकी परिसरात राहणाऱ्या पदवीधर युवकाने अवैध दारूविक्रीचा व्यवसाय सुरू केला. त्याने दारूसाठा लपविताना स्वत:चे तांत्रिक कौशल्य लावले. यामुळे जांब वाघाडी येथे सुरू असलेला दारू गुत्ता अनेक वर्षानंतर उजेडात आला. ग्रामीण पोलिसांनी टाकलेल्या धाडीत चक्क देवाºह्याच्या खाली दारूचा साठा असल्याचे निष्पन्न झाले. ४० लिटर दारू एकाच जागेवरून जप्त केली.सचिन राजू इंगळे (३२) रा. मुलकी यवतमाळ, असे आरोपीचे नाव आहे. सचिनने कला शाखेची पदवी घेतली आहे. शिवाय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत इलेक्ट्रिशियनचा कोर्सही केला आहे. त्याने आपले कौशल्या अवैध दारू विक्रीच्या व्यवसायात वापरले. यवतमाळातील घरात गाळलेल्या दारूचे जांब वाघाडी येथील घरात साठा केला जात होता. येथूनच परिसरातील गावांमध्ये दारू पुरवठा सुरू होता. एखाद्या शुद्ध पाण्याच्या प्लांट प्रमाणे अगदी मोटरपंप लावून दारू नळाद्वारे दिली जात होती. यातील सूत्रधार सचिन इंगळे हा पसार आहे.सण-उत्सवाचे दिवस जवळ आल्याने ग्रामीण भागात गावठी दारूच्या भट्ट्या पेटल्या आहे. यवतमाळ तालुक्यात बहुतांश ठिकाणी दारू गाळप होते. जंगलातील नाल्या काठचा परिसर निवडला जातो. काही ठिकाणी शेतातच दारू गाळली जाते. यावर नियंत्रणासाठी पोलिसांची धडक मोहीम सुरू आहे.अशी लढविली शक्कलसचिनने जांब वाघाडी येथील घरावर ५०० लिटरची टाकी बसविली. त्या टाकीत दारू साठविली जात होती. त्यातून ही दारू घरातील देव्हाऱ्याच्या खाली असलेल्या ४० लिटरच्या ड्रममध्ये येत होती. या ड्रमलाही एक विसर्ग देऊन अंगणातील भूमिगत टाक्यात दारू जमा होत होती. देव्हाºयाखालील टाकीतून दारू काढण्यासाठी कुलरचा पंप वापरला होता. बटन दाबताच बाजूला असलेल्या नळातून दारू येत होती. ठोक व चिल्लर अशा दोन्ही स्वरुपाची विक्री येथून सुरू होती. ग्रामीण पोलिसांनी धाड टाकून या अवैध व हायटेक दारू विक्री अड्ड्याचा भंडाफोड केला. कारवाईत ३४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.खरुला येथे भूमिगत दारूसाठागावालगत जमिनीत गाडून ठेवलेल्या दारूचा माग काढत ग्रामीण पोलिसांनी खरूला हे गाव गाठले. तेथे दोघांना अटक केली. आकाश देवीदास शेडमाके (२२), विकास देवीदास शेडमाके (२१) असे अटकेतील आरोपींची नावे आहेत. तर देवीदास यशवंत शेडमाके (५५), रोहण रमेश मेश्राम (२०) हे दोघे पसार झाले आहेत. येथे एक लाख १९ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला.

टॅग्स :liquor banदारूबंदीArrestअटक