शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
3
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

टेक्सटाईल झोन जागेअभावी वांद्यात

By admin | Updated: September 11, 2016 00:57 IST

मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेला यवतमाळातील बहुप्रतिक्षीत टेक्सटाईल झोन पुरेशा जागेअभावी वांद्यात सापडला आहे.

राजकीय अनास्था : मुंबईत घेणार आढावा यवतमाळ : मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेला यवतमाळातील बहुप्रतिक्षीत टेक्सटाईल झोन पुरेशा जागेअभावी वांद्यात सापडला आहे. आता या झोनच्या अस्तित्वाबाबतचा आढावा १५ सप्टेंबरनंतर एमआयडीसीकडून मुंबईत घेतला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महिन्यांपूर्वी एकाच वेळी चार टेक्सटाईल झोन घोषित केले होते. त्यात यवतमाळचाही समावेश होता. सर्वाधिक कापूस पिकविणारा जिल्हा म्हणून यवतमाळची ओळख असल्याने येथे प्रक्रिया उद्योग निर्माण व्हावे, त्यातून रोजगार निर्मिती व्हावी, पर्यायाने शेतकरी आत्महत्या थांबविण्यास मदत व्हावी या उदात्त हेतूने हा झोन घोषित करण्यात आला होता. या टेक्सटाईल झोनसाठी यवतमाळच्या विस्तारीत औद्योगिक वसाहतीमधील ६९ हेक्टर जागा आरक्षित करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर यवतमाळ व अमरावती एमआयडीसीच्या कार्यालयांमध्ये काहीशा हालचाली झाल्यात, फाईली फिरल्या परंतु त्यानंतर सर्व काही थंडबस्त्यात पडले. गेली काही महिने टेक्सटाईल झोनच्या मुद्यावर एमआयडीसीमध्ये शुकशुकाट पहायला मिळतो आहे. विशेष असे या टेक्सटाईल झोनबाबत राज्य शासनातील कुणीही मंत्री, आमदार किंवा माजी आमदार, राजकीय नेते कुणीही ब्रसुद्धा काढलेला नाही. यावरून टेक्सटाईल झोनला स्थापनेपूर्वीच राजकीय अनास्थेचे ग्रहण लागल्याचे दिसून येते. ते पाहून आता एमआयडीसीने जागा कमी पडत असल्याचा मुद्दा पुढे केला आहे. यवतमाळच्या टेक्सटाईल झोनसाठी किमान अडीचशे हेक्टर जागेची आवश्यकता आहे. ६९ हेक्टर जागेतील टेक्सटाईल झोन सोईचा होणार नाही. सीएमओच्या आग्रहामुळे झालाच तर येथे मोठे उद्योग येण्याची शक्यता राहणार नाही. टेक्सटाईल झोन आल्यास त्याच्या जलनि:सारणाचा प्रकल्प उभारावा लागणार आहे. अर्थात दूषित पाणी पुन्हा शुद्ध करून वापरायोग्य बनवावे लागणार आहे. या प्रकल्पासाठी किमान ३०० कोटींचे बजेट असून सहा ते सात हेक्टर जागा लागणार असल्याचे एमआयडीसीच्या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे टेक्सटाईल झोनची जागा आणखीनच कमी होईल. ज्या भागात ६९ हेक्टर जागा टेक्सटाईल झोनसाठी आरक्षित करण्यात आली. तेथे या जागेचा आणखी विस्तार करण्याची आणि ही जागा अडीचशे हेक्टरपर्यंत वाढविण्याची कोणतीही सोय नाही. कारण दोन बाजूंनी मुख्य मार्ग आले असून एका साईडला आधीच मोठा उद्योग थाटला गेलेला आहे. त्यामुळे टेक्सटाईल झोनच्या विस्ताराची अडचण निर्माण होणार आहे. या पार्श्वभूमीवर एमआयडीसीकडून या झोनचा मुंबईत आढावा घेतला जाणार आहे. त्यात या झोनच्या भवितव्याचा फैसला होण्याची शक्यता आहे. राजकीय गोटातील शांतता पाहता त्यांनाही हा झोन नको की काय अशी शंका निर्माण होत आहे. आमदारांच्या एका समितीतील सदस्यांनी हा झोन यवतमाळ ऐवजी लगतच्या तालुक्यांमध्ये शिप्ट करण्याची सूचना केली होती. (जिल्हा प्रतिनिधी)