यवतमाळ परिसरात माकडांच्या टोळक्याची दहशत; आठ जणांना चावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 05:06 PM2021-05-21T17:06:53+5:302021-05-21T17:07:23+5:30

Yawatmal news सध्या गाव परिसरात माकडांच्या टोळक्यांनी धुमाकूळ सुरू केला आहे. धान्य व अन्य वस्तूंची नासधूस करणाऱ्या या माकडांनी आता माणसांवर हल्ले चढविणे सुरू केले आहे. त्यातूनच गुरुवारी तब्बल आठ जणांना गंभीर चावा घेतल्याची घटना डेहणी येथे घडली.

Terror of monkeys in Yavatmal area; Eight people were bitten | यवतमाळ परिसरात माकडांच्या टोळक्याची दहशत; आठ जणांना चावले

यवतमाळ परिसरात माकडांच्या टोळक्याची दहशत; आठ जणांना चावले

Next


लोकमत न्यूज नेटवर्क

यवतमाळ : सध्या गाव परिसरात माकडांच्या टोळक्यांनी धुमाकूळ सुरू केला आहे. धान्य व अन्य वस्तूंची नासधूस करणाऱ्या या माकडांनी आता माणसांवर हल्ले चढविणे सुरू केले आहे. त्यातूनच गुरुवारी तब्बल आठ जणांना गंभीर चावा घेतल्याची घटना डेहणी येथे घडली. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे.

विनायक अर्जुन (५५), सुभाष ठाकरे (५१), नागोजी मेश्राम (६०), नारायण वारसकर, प्रफुल्ल चंदनखेडे (४०), सुधीर चंदनखेडे (३४), देवीचंद रंगारी (४०) आणि प्रमोद चुटे (४०) (सर्व रा. पहूर) या आठ जणांना माकडांनी चावा घेतला. ही घटना डेहणी ता. बाभूळगाव येथील बसथांब्यावर घडली.
सध्या उन्हामुळे जंगलातील माकडांची टोळकी रस्त्यावर, वस्त्यांमध्ये येत आहेत. डेहणीच्या बसथांब्यावर गेल्या आठ दिवसांपासून माकडांच्या एका टोळक्याने धुमाकूळ घातला आहे. येणाऱ्या- जाणाऱ्या नागरिकांभोवती ही माकडे जमतात. वाहनांना धक्का देऊन पाडतात.
त्यातच गुरुवारी तब्बल आठ जणांना चावा घेतला. या आठ जणांनी यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेऊन उपचार घेतले. दरम्यान, गावकऱ्यांनी सूचना दिल्यानंतर वनविभागाची चमू डेहणीच्या बसथांब्यावर माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी पोहोचली, मात्र माकडे त्यांच्या हाती लागली नाहीत. या घटनेने सध्या परिसरात दहशत आहे. विशेष म्हणजे, असेच टोळके गेल्या काही दिवसांपासून यवतमाळ-घाटंजी मार्गावर कोळंबी फाट्यावरही धुमाकूळ घालत आहे. गुरुवारीच या मार्गावर एका दाम्पत्याची दुचाकी माकडांनी अडविल्याने हे दाम्पत्य घाबरून गेले होते.

Web Title: Terror of monkeys in Yavatmal area; Eight people were bitten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Monkeyमाकड