शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

तंत्रस्नेही शिक्षकांना जुंपले डाटा एन्ट्रीच्या कामाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 05:09 IST

वर्गअध्यापनात अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर व्हावा, यासाठी शासनाने शिक्षकांना तंत्रस्नेही होण्याचे आवाहन केले.

अविनाश साबापुरे ।यवतमाळ : वर्गअध्यापनात अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर व्हावा, यासाठी शासनाने शिक्षकांना तंत्रस्नेही होण्याचे आवाहन केले. मात्र, आता त्याच शिक्षकांकडून चक्क डाटा एन्ट्रीचे काम करवून घेण्याचे आदेश देत शासनाने राज्यभरातील तब्बल दीड लाख तंत्रस्नेही शिक्षकांना हादरवून सोडले आहे.प्रत्येक शाळा डिजिटल व्हावी, प्रत्येक शिक्षक तंत्रस्नेही व्हावा, असा आग्रह शिक्षण विभागाने गेल्या दोन वर्षांपासून धरला होता. त्याला शिक्षकांनीही उत्तम प्रतिसाद दिला. दोन वर्षांत तब्बल १ लाख ५८ हजार ५८३ शिक्षकांनी तंत्रज्ञान अवगत करून घेतले. शासनाच्या संकेतस्थळावर अधिकृत तंत्रस्नेही शिक्षक म्हणून त्यांनी नोंदणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही नोंदणी दरदिवशी वाढते आहे. दरम्यान, हे शिक्षक अध्यापनात अद्ययावत पद्धतींचा वापर करीत असल्याने त्यांना सन्मानाची वागणूक मिळेल, अशी अनेकांना अपेक्षा होती. मात्र, १४ आॅगस्ट रोजी शिक्षण विभागाने काढलेल्या आदेशात या शिक्षकांकडून चक्क डाटा एन्ट्रीचे काम करवून घेण्याची सूचना शिक्षणाधिकाºयांना केली आहे.राज्यातील प्रत्येक शाळा आणि प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती आॅनलाइन केली जात आहे. सरल प्रणालीत ३० सप्टेंबरपर्यंत नोंदविलेल्या विद्यार्थी संख्येवरूनच शिक्षकांची संचमान्यता करून दिली जाणार आहे. त्यासाठी ३१ आॅगस्टपर्यंत माहिती अपडेट करण्याचे आदेश आहेत. विभागीय स्तरावर ही जबाबदारी शिक्षण उपसंचालकांना, जिल्हास्तरावर शिक्षणाधिकाºयांना, तर तालुका पातळीवर गटशिक्षणाधिकाºयांना सोपविण्यात आली आहे. परंतु, सरलमध्ये डाटा भरण्यासाठी शिक्षण विभागाकडे तज्ज्ञ मनुष्यबळच उपलब्ध नसल्याने या कामासाठी चक्क तंत्रस्नेही शिक्षकांच्या सेवा घेण्याचे आदेश आहेत.>...तर दिवाळीचा पगार अडवणारशाळेची इत्थंभूत माहिती ३१ आॅगस्टपर्यंत सरलवर आॅनलाइन करणे आवश्यक आहे. एखाद्या संस्थेअंतर्गत असलेल्या एखाद्या शाळेची माहिती ३१ आॅगस्टपर्यंत सरलवर देण्यात आली नाही, तर त्या संस्थेतील सर्वच शाळांचे व शिक्षणाधिकाºयांचेही वेतन आॅक्टोबर या ऐन दिवाळीच्या महिन्यात अडविले जाणार आहे. त्यामुळे तालुका पातळीवर आता तंत्रस्नेही शिक्षकांच्या मागे डाटा एन्ट्री करून देण्यासाठी दट्ट्या लावला जाणार आहे.