शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
6
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
7
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
8
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
9
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
10
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
11
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
12
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
13
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
14
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
15
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
16
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
17
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
18
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
19
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
20
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या संकटात शिक्षक बनलेय संपादक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 05:00 IST

आश्रमशाळा आणि जिल्हा परिषदेच्या शाळांपुढे कोरोनाने मोठ्या अडचणी उभ्या केल्या. गोरगरिबांच्या पोरांना शिकविणाऱ्या या शाळांमधील शिक्षकांनी अध्यापनाच्या धडाकेबाज पद्धती शोधून कोरोनातही अध्यापन सुरू ठेवले. त्यांच्या धाडसाच्या कहाण्या शिक्षकांनीच लिहून, संपादित केल्या. त्यातूनच ‘आश्रमशाळा अस्मिता’ आणि ‘शिक्षक मित्र’ ही दोन मासिके यवतमाळ जिल्ह्यात जन्मास आली आणि महिनाभरात संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांच्या हाती पडली.

ठळक मुद्देजिल्ह्यात सुरुवात, राज्यावर स्वारी : ‘अनलॉक लर्निंग’, शैक्षणिक धोरणावर अनुभवी लेखन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मोकळा वेळ ही संपत्ती आहे. त्याचा सदुपयोग केला तर जीवन समृद्ध होत जाते. संकटांची मालिका घेऊन आलेला कोरोना अनेकांसाठी असा भरपूर मोकळा वेळ आला आहे. राज्यातील शिक्षकांनी या वेळेचा सर्जनशील वापर करीत थेट संपादनाचे शिवधनुष्य उचलले आहे. कोरोना संकटाने शाळांना शिकविलेले अनुभव लिहून काढत आश्रमशाळा आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी मासिकांचा उपक्रम सुरू केला आहे.आश्रमशाळा आणि जिल्हा परिषदेच्या शाळांपुढे कोरोनाने मोठ्या अडचणी उभ्या केल्या. गोरगरिबांच्या पोरांना शिकविणाऱ्या या शाळांमधील शिक्षकांनी अध्यापनाच्या धडाकेबाज पद्धती शोधून कोरोनातही अध्यापन सुरू ठेवले. त्यांच्या धाडसाच्या कहाण्या शिक्षकांनीच लिहून, संपादित केल्या. त्यातूनच ‘आश्रमशाळा अस्मिता’ आणि ‘शिक्षक मित्र’ ही दोन मासिके यवतमाळ जिल्ह्यात जन्मास आली आणि महिनाभरात संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांच्या हाती पडली. विशेष म्हणजे, संपूर्ण मोफत आणि स्वत:च्या अनुभवातून, शब्दातून सजलेली ही मासिके शिक्षकांसोबतच पालक, विद्यार्थी आणि अधिकारी यांच्यातील वैचारिक सेतू ठरत आहेत.आश्रमशाळांची ‘अस्मिता’आश्रमशाळा शिक्षकांनी एकत्र येत ‘आश्रमशाळा अस्मिता’ मासिकाची निर्मिती केली. गांधी जयंतीचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांच्या हस्ते व आदिवासी विकास विभागाचे माजी सहआयुक्त दशरथ पानमंद यांच्या उपस्थितीत आॅनलाइन पद्धतीने त्याचे लोकार्पण झाले. पहिला अंक ‘अनलॉक लर्निंग’मधील धडपडीवर आधारीत असल्याचे संपादक विशाखा केवटे, सहसंपादक साहेबराव मोहोड यांनी सांगितले.जिल्हा परिषदेचे ‘शिक्षक मित्र’जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी एकत्र येत ‘शिक्षक मित्र’ हे मोफत त्रैमासिक सुरू केले. नवे शैक्षणिक धोरण समजावून सांगणारे लेख यात शिक्षकांनीच दिले. डॉ. सतपाल सोवळे, किशोर तळोकार, विजय वाघ, अरविंद झलके, डॉ भारती ताठे, मनोज भुजबले, महादेव निमकर, हितेश राठोड, मंदार पुंडशास्त्री, संदीप कोल्हे, निलेश सपाटे संपादकीय काम करीत आहेत. उपक्रमशील शिक्षकांना वाव मिळावा, याकरिता ही धडपड असल्याचे अवधुत वानखडे, गजू पोयाम यांनी सांगितले.

टॅग्स :Teacherशिक्षकcorona virusकोरोना वायरस बातम्या