यवतमाळच्या माळेगावमध्ये बिबट्याचा संशयास्पद मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 17:05 IST2021-02-23T17:04:46+5:302021-02-23T17:05:18+5:30
आर्णी वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या दक्षिण वनक्षेत्र भागात माळेगाव शिवारामध्ये बिबट्या मृत अवस्थेत आढळला.

यवतमाळच्या माळेगावमध्ये बिबट्याचा संशयास्पद मृत्यू
सावळी सदोबा(यवतमाळ) : आर्णी वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या दक्षिण वनक्षेत्र भागात माळेगाव शिवारामध्ये बिबट्या मृत अवस्थेत आढळला. त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे कळू शकले नाही. वन विभागाच्या स्थानिक कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना याची माहिती दिली आहे.
दक्षिण आर्णी वनपरिक्षेत्र घनदाट जंगल आहे. येथे वन्यप्राण्यांचा सतत वावर असतो. माळेगाव येथे शेतशिवारात सकाळी ग्रामस्थ शेतात जात असताना त्यांना बिबट्या पडून दिसला. जवळ जावून बघितले असता तो मृत असल्याचे आढळून आला. याची माहिती वन कर्मचाऱ्यांना देण्यात आली. वन विभागाचे जिल्हा मुख्यालयातील पथक माळेगाव येथे दाखल झाले आहे. शवचिकित्सा करून बिबट्याचा मृत्यू कशामुळे झाला याचा शोध घेतला जाणार आहे. यासंदर्भात वन अधिकाऱ्यांनी अधिक बोलण्याचे टाळले.