मूल होत नसल्याने आत्महत्या

By Admin | Updated: October 7, 2014 23:40 IST2014-10-07T23:40:37+5:302014-10-07T23:40:37+5:30

मूल होत नसल्याने एका विवाहितेचा पती आणि सासरच्या मंडळींनी छळ केला. हा छळ असह्य झाल्याने तिने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना घाटंजी तालुक्यातील जरूर येथे घडली.

Suicide due to not having a child | मूल होत नसल्याने आत्महत्या

मूल होत नसल्याने आत्महत्या

जरूरची घटना : पतीसह तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा
यवतमाळ : मूल होत नसल्याने एका विवाहितेचा पती आणि सासरच्या मंडळींनी छळ केला. हा छळ असह्य झाल्याने तिने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना घाटंजी तालुक्यातील जरूर येथे घडली. याप्रकरणी पतीसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वृषाली सुनील मडावी (२५) रा. जरूर असे मृत विवाहितेचे नाव आहे. मुलबाळ होत नसल्याच्या कारणावरून पती सुनील सीताराम मडावी आणि त्याचे दोन नातेवाईक सर्व रा. जरूर यांनी तिचा शारीरिक व मानसिक छळ चालविला. हा छळ असह्य झाल्याने तिने रविवारी राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात येताच तिला घाटंजी येथील रूग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचाराला प्रतिसाद न देता रूग्णालयात तिचा मृत्यू झाला. घटनेनंतर घाटंजी पोलिसांनी या प्रकरणी पती सुनील याच्यासह तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविला. वृत्त लिहेस्तोवर अटक झाली नव्हती. (स्थानिक प्रतिनिधी)
महिला कक्ष पांढरा हत्ती
कौटुंबिक कलहाची आणि विवाहितेच्या छळाची प्रकरणे वाटाघाटीने निकाली निघावी तसेच त्यांचे संसार सुरळीत चालावे यासाठी जिल्हा परिषदेपासून तर पोलीस खात्यापर्यंत सर्वच ठिकाणी महिला समेट कक्ष उघडण्यात आले. मात्र विवाहितांच्या छळाच्या घटनांवरून ते पांढरा हत्ती ठरत असल्याचे दिसते.

Web Title: Suicide due to not having a child