शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ११ रूपयांनी स्वस्त साखर लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 22:36 IST

लेव्हीची साखर देण्यास टाळाटाळ करणाऱ्या साखर कारखान्यांनी ही साखर देण्याची तयारी दर्शविली आहे. उपलब्ध झालेली ही साखर मिळविण्यासाठी पुरवठा विभागाला स्वत: उचल करावी लागणार आहे.

ठळक मुद्देरेशनद्वारे वितरण : पुरवठा विभाग थेट कारखान्यात पोहोचणार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लेव्हीची साखर देण्यास टाळाटाळ करणाऱ्या साखर कारखान्यांनी ही साखर देण्याची तयारी दर्शविली आहे. उपलब्ध झालेली ही साखर मिळविण्यासाठी पुरवठा विभागाला स्वत: उचल करावी लागणार आहे. या प्रक्रियेमुळे शासनाचे प्रती किलोवर ११ रूपये वाचणार असून जिल्ह्यातील ग्राहकांनाही स्वस्त धान्य दुकानातून स्वस्त साखर मिळणार आहे.लेव्हीची साखर न मिळाल्याने दरवेळी बोली बोलून शासन साखर खरेदी करते. ही साखर ३० रूपये किलो पडते. दुकानातून २० रूपये किलो विकली जाते. लेव्हीची साखर जागेवरूनच १९.८८ पैशाने मिळणार आहे. यामुळे शासनाचे किलोमागे ११ रूपये वाचणार आहेत.एकूण निर्मित साखरेपैकी काही कोटा आरक्षित करून तो लेव्हीच्या मदतीने स्वस्त धान्यदुकानाला पुरवायचा असतो. मात्र कारखाने अशी साखर उपलब्ध असल्याचे कधी सांगतच नाही. यावेळी कारखान्याने लेव्हीची साखर उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र ही साखर पाठविण्यासाठी त्यांच्याकडे यंत्रणा नाही. यामुळे पुरवठा विभाग ही साखर जिल्ह्यात आणणार आहे. त्या दृष्टीने पुरवठा विभागाने संपूर्ण नियोजन केले आहे. जिल्ह्याला दोन महिन्यांचा चार हजार क्विंटलचा कोटा मिळणार आहे. यामुळे शासकीय तिजोरीचा भुर्दंड टळणार आहे. ग्राहकांना साखर उपलब्ध होणार आहे. ११ रुपयांनी स्वस्त साखरेचा लाभ होणार आहे.गैरप्रकारावर आळास्वस्त धान्य दुकानदारांनी ज्या महिन्याचे धान्य, त्याच महिन्यात वितरित करण्याच्या सूचना आहेत. यानंतरही धान्य शिल्लक राहिल्यास पुढील महिन्याच्या कोट्यात लोकसंख्येनुसार नव्याने धान्य देताना शिलकीचा कोटा वजा करून धान्य दिले जाणार आहे. यामुळे धान्य दुकानातील गैरप्रकारालाच आळा बसणार आहे.तूर डाळ, चणा डाळ आलीजिल्ह्यात तूर, उडीद आणि चणाडाळीचा पुरवठा करण्यात आला आहे. सात हजार ४८६ क्विंटल तूरडाळ, ११९५ क्विंटल चणाडाळ आणि ४९९ क्विंटल उडीद डाळीचा पुरवठा झाला आहे. मात्र चार हजार क्विंटल साखरेचा पुरवठा बाकी आहे.लेव्हीची साखर पुरवठादारामार्फत जिल्ह्यात आणली जाणार आहे. स्वस्त धान्य दुक ानातून ती वितरित करण्यात येणार आहे. डाळीचा जिल्ह्याला पुरवठा झाला आहे. ज्या महिन्याचे धान्य त्याच महिन्यात वितरित करण्याच्या सूचना आहेत.- शालीग्राम भराडीजिल्हा पुरवठा अधिकारी, यवतमाळ

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने