शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
2
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
3
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
4
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
5
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
6
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
7
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
8
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
9
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
10
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
11
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
12
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
13
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
14
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
15
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
16
शनिवारी, रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक; मध्य रेल्वे सेवा पूर्णत: बंद राहणार, मेल-एक्स्प्रेसना फटका
17
इराणची नाकेबंदी सुरूच, ट्रम्प यांचा 'नवा प्लॅन'; संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे
18
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
19
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
20
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
Daily Top 2Weekly Top 5

४८ हजार शेतकऱ्यांचा अहवाल सादर करा

By admin | Updated: April 11, 2015 23:54 IST

राज्य शासनाने जाहीर केलेली ४८ हजार शेतकऱ्यांची दुष्काळी मदत बँक खाते नसल्याने परत गेली. ..

आयुक्तांचे आदेश : बँक खाते नसल्याने दुष्काळी मदतीचे पैसे परत गेल्याचे प्रकरण यवतमाळ : राज्य शासनाने जाहीर केलेली ४८ हजार शेतकऱ्यांची दुष्काळी मदत बँक खाते नसल्याने परत गेली. या प्रकरणाची गंभीर दखल विभागीय आयुक्तांनी घेतली असून खाते नसणाऱ्या ‘त्या’ शेतकऱ्यांचा तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. यानुसार १५ एप्रिलपर्यंत तहसीलदारांना जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करावा लागणार आहे.यवतमाळ जिल्ह्यात खरीप हंगामात अपुऱ्या पावसाने भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाली. शासनाने या शेतकऱ्यांसाठी हेक्टरी मदत जाहीर केली. जिल्ह्यातील चार लाख ४७ हजार ५६ शेतकरी दुष्काळी मदतीस पात्र ठरले होते. त्यासाठी २४४ कोटी ४१ लाख १८ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. यातील तीन लाख ९९ हजार ९१० शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २१२ कोटी रुपयांचा निधी जमा करण्यात आला. मात्र ४८ हजार शेतकऱ्यांचे बँक खाते शोधूनही सापडले नाही. आर्थिक वर्ष संपत आल्याने या शेतकऱ्यांचा २९ कोटी रुपयांचा निधी शासन जमा झाला. या संदर्भात तहसील प्रशासनाने विविध कारणे सादर केली आहे. मात्र प्रत्यक्षात काय घडले, बँक खाते का नव्हते, प्रशासनाने कोणत्या पद्धतीने शोध घेतला याबाबतचा अहवाल आता संबंधित तहसीलदारांना सादर करावा लागणार आहे. या अहवालानंतर राज्य शासन काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले असून परत गेलेला निधी पुन्हा मिळतो की काय याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. (शहर वार्ताहर) निधीवर प्रश्नचिन्ह खाते नसलेल्या शेतकऱ्यांचा निधी परत गेला. मात्र यानंतर शेतकऱ्यांच्या विविध तक्रारी पुढे येत आहे. खाते नंबर असताना तलाठ्याने नंबर दिला नाही. त्यामुळे मदत मिळाली नाही. यासह विविध तक्रारींचा यात समावेश आहे. मार्च अखेर परत गेलेला हा निधी परत येणार किंवा नाही यासाठी प्रशासनाला ठोस पुरावे द्यावे लागतील.