शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण

By admin | Updated: August 3, 2014 23:37 IST

एरव्ही वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांच्या रोषाला वीज वितरणचे कर्मचारी बळी पडतात. मात्र यवतमाळातील भोसा नाका परिसरात वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी गेलेल्या तीन कर्मचाऱ्यांना

गुन्हा दाखल : भोसा नाका परिसरातील घटनायवतमाळ : एरव्ही वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांच्या रोषाला वीज वितरणचे कर्मचारी बळी पडतात. मात्र यवतमाळातील भोसा नाका परिसरात वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी गेलेल्या तीन कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. ही घटना शनिवारच्या मध्यरात्री घडली. या प्रकरणी तिघांविरुद्ध वडगाव रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शहरातील भोसा नाका परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. या प्रकरणाची तक्रार वीज वितरण कंपनीकडे करण्यात आली. तक्रार निवारण केंद्र क्र. ५ मध्ये कार्यरत वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ तंत्रज्ञ राहूल माणिक नारनवरे, योगेश सूर्यवंशी आणि वीज सहायक रामेश्वर सर्जे भोसा नाका परिसरात गेले. मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास खंडित वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू करीत होते. त्यावेळी परिसरातील काही जणांनी या कर्मचाऱ्यांसोबत वाद घातला. तक्रार दिल्यानंतर एवढ्या उशिरा कसे आले, तुम्ही काम करीत नाही असा आरोप केला. यावेळी कर्मचाऱ्यांसोबत हातापायी सुरू झाली. कर्मचाऱ्यांवर काही जण धावून आले. वादात या कर्मचाऱ्यांना जेली अजगर, आदील, शहेजाद रा. इंदिरानगर यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्यांच्या अंगावरील कपडेही फाडले. या प्रकरणी राहूल नारनवरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध वडगाव रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या मारहाणीच्या घटनेचा निषेध एमएसईबी वर्कर्स फेडरेशन, तांत्रिक कामगार युनियन, एसीई आणि इतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. दोषींवर कडक कारवाई करून कर्मचाऱ्यांना संरक्षण द्यावे, अशी मागणी वर्कर्स फेडरेशनचे पदाधिकारी डी.बी. दहेलकर, आर.के. गुल्हाने, एम.एल. वेळूकर, दीपक मिसाळ, रितेश सव्वालाखे, रवाळे, जयस्वाल यांनी केली आहे. या घटनेने वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यात तीव्र असंतोष पसरला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)