शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

पुसदमध्ये सात दिवस कडकडीत बंदची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 05:00 IST

पाच-सहा दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. कोरोनाला रोखण्यासाठी शुक्रवारी लोकप्रतिनिधी, व्यापारी, डॉक्टर, राजकीय पक्षांचे पदाधिकारी व अधिकारी यांची बैठक झाली. बैठकीला तीन आमदारांसह चेंबर आॅफ कॉमर्स व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत लॉकडाऊनचा निर्णय प्रशासनावर सोपविण्यात आला होता.

ठळक मुद्दे१५ ते २१ जुलै : औषधी दुकाने वगळता संपूर्ण बाजारपेठ बंद, भाजीपाला विक्रीवर घातले निर्बंध

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : गेल्या काही दिवसांपासून शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. तूर्तास तालुक्यात १८ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाने १५ ते २१ जुलैपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या सात दिवसात केवळ दवाखाने आणि औषधी दुकाने वगळता इतर सर्व दुकाने व सेवा बंद ठेवल्या जाणार आहे.पाच-सहा दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. कोरोनाला रोखण्यासाठी शुक्रवारी लोकप्रतिनिधी, व्यापारी, डॉक्टर, राजकीय पक्षांचे पदाधिकारी व अधिकारी यांची बैठक झाली. बैठकीला तीन आमदारांसह चेंबर आॅफ कॉमर्स व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत लॉकडाऊनचा निर्णय प्रशासनावर सोपविण्यात आला होता. त्यानुसार रविवारी उपविभागीय अधिकारी डॉ.व्यंकट राठोड यांनी १५ ते २१ जुलैपर्यंत शहरासह ग्रामीण भागात लॉकडाऊन घोषित केला.शहर व ग्रामीण भागात सोशल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसत नाही. अनेक नागरिक विनाकारण घराबाहेर पडतात, अनावश्यक प्रवास करतात, बाजारात गर्दी करतात, अनेकजण मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करीत नाही, घराच्या आजूबाजूला जमाव करून बसतात. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्याला आळा घालण्यासाठी प्रशासनाने रविवारी कठोर पाऊल उचलले.जिल्हाधिकारी एम. डी. सिंग यांच्या मार्गदर्शनात प्रशासनाने १५ ते २१ जुलैदरम्यान सात दिवस लॉकडाऊन घोषित केले. शहरासह शेंबाळपिंपरी, जांबबाजार, बेलोरा येथील बाजारपेठ पूर्णपणे बंद राहणार आहे. या बंदच्या कालावधीत कुणीही आपल्या घराच्या बाहेर पडू नये किंवा आपल्या परिसरात एकत्रित येऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. शहरातील प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांनी कोरोना योद्ध्यांची जवाबदारी स्वीकारली आहे. नगरसेवक आपल्या प्रभागात प्रशासनाला मदत करणार आहे.नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. अन्यथा नियम तोडणाऱ्यांवर दंडात्मक आणि फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा उपविभागीय अधिकारी डॉ.व्यंकट राठोड यांनी दिला आहे.मॉर्निंग व इव्हिनिंग वॉकलाही बंदीदवाखाने व औषधी दुकाने वगळता सर्व बाजारपेठ बंद राहणार आहे. यात किराणा दुकान व दुधाचाही समावेश आहे. सोबतच भाजीपाला विक्रीही करता येणार नाही. याशिवाय मॉर्निंग व इव्हिनिंग वॉकलासुद्धा बंदी घालण्यात आली. तालुक्याची कोरोना रुग्णसंख्या ३२ वर पोहोचल्याने हा निर्णय घेण्यात आला. तूर्तास तालुक्यात १८ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहे. १३ जण बरे होऊन घरी परतले. एकाचा मृत्यू झाला. अद्याप ५८ जणांचे रिपोर्ट अप्राप्त आहे. पुसदमध्येच शनिवारपासून रॅपिट टेस्ट केली जात आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या