शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यासाठी रास्ता रोको

By admin | Updated: May 5, 2017 02:42 IST

देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावरील किवळे ते शितळानगर दरम्यानच्या सेवा रस्त्याचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले

देहूरोड : देहूरोड-कात्रज  बाह्यवळण मार्गावरील किवळे ते शितळानगर दरम्यानच्या सेवा  रस्त्याचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले काम सुरू करण्याच्या मागणीसाठी फुले-शाहू-आंबेडकर विचार मंच व स्थानिक नागरिकांनी गुरुवारी दुपारी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. विकासनगर येथील दुभाजकातील रस्ता बंद केल्याने गहुंजे, विकासनगर, उत्तमनगर, किवळे भागातील विद्यार्थी, नागरिकांना पर्यायी व्यवस्था नसल्याने दोन-अडीच किलोमीटरचा वळसा घालावा लागत असल्याने  मोठी गैरसोय, वेळेचा व पैशाचा अपव्यय होऊ लागला आहे. पर्यायी रस्त्यावर देखील उलट दिशेनेच वाहने न्यावी लागत असल्याने त्या ठिकाणीही अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. शितळानगर (मामुर्डी) येथील भुयारी मार्गाचे बांधकाम रखडले आहे. नागरिकांना पर्यायी रस्ता उपलब्ध करण्यात आलेला नाही. विकासनगर ते शितळानगर (मामुर्डी) दरम्यानची सेवा रस्त्याचे काम रखडलेले आहे. दरम्यान, गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास मंचाचे अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी बोर्डाचे सदस्य गोपाळराव तंतरपाळे, महेश गायकवाड, पंकज तंतरपाळे, तसेच मंचाचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.  आंदोलकांनी काही काळ वाहतूक रोखून धरली. आंदोलनाच्या वेळी पोलीस पोहोचण्यास उशीर झाल्याने वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या. (वार्ताहर) अधिकाऱ्यांनी घेतली आंदोलकांची भेटसहायक पोलीस निरीक्षक ज्योती पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी अर्ध्या तासात आंदोलनाच्या ठिकाणी येत असल्याची माहिती दिल्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार रास्ता रोको आंदोलन थांबविण्यात आले. प्राधिकरणाचे तांत्रिक व्यवस्थापक मिलिंद वाबळे, तसेच देहूरोड ते सातारा सहा पदरीकरण करणाऱ्या संबंधित ठेकेदाराचे प्रतिनिधी यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी आंदोलकांची भेट घेतली. वाबळे यांनी येत्या सोमवारी सेवा रस्त्याचे काम सुरु करण्यात येईल, पोलिसांकडून पुलाखालून होणारी वाहतूक इतरत्र वळविण्याची परवानगी मिळाल्यानंतर पुलाचे काम सुरु करण्यात येणार आहे . तसेच किवळे येथील भुयारी मार्ग व पादचारी उड्डाणपूल यांचा एका महिन्यात वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले .