शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने भिजलेल्या पांढऱ्या सोन्याला सुटली दुर्गंधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 05:00 IST

परिसरात सुरुवातीला झालेल्या चांगल्या पावसामुळे पऱ्हाटी जोमात होती. या पिकाला कापूसही चांगला फुटला. आता घरात पीक येणार ही परिस्थिती असतानाच गेली काही दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली. थोडीही उसंत पाऊस घेत नसल्याने फुटलेला कापूस झाडालाच ओला होत आहे. गळून पडून मातीत खराब होवू नये यासाठी वेचून घरी आणला जात आहे. आता ओल्या कापसाच्या दुर्गंधीने घरात बसणेही कठीण झाले आहे.

ठळक मुद्देशेतमाल कुलरच्या हवेत : पावसाच्या हजेरीने शेतकरी मेटाकुटीस, जोमात असलेल्या पिकाला लागली दृष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : घरात येत असलेल्या पांढऱ्या सोन्याला निसर्गाची दृष्ट लागली आहे. शेतकऱ्यांचे येणाऱ्या काळातील सण, उत्सव चांगले साजरे होईल असे उत्पन्न होत असतानाच पावसाची सतत रिपरिप सुरू आहे. यामुळे झाडालाच ओला झालेला कापूस घरात आणून टाकला आहे. या कापसाची दुर्गंधी सुटल्याने तो वाळविला जात आहे. यासाठी कुलर, पंख्याची हवा दिली जात आहे. ऊन पडलेच तर कापूस वाळविण्यासाठी अंगणात टाकला जात आहे. तालुक्याच्या सर्वदूर असलेले हे चित्र शेतकऱ्यांची चिंता वाढवित आहे.परिसरात सुरुवातीला झालेल्या चांगल्या पावसामुळे पऱ्हाटी जोमात होती. या पिकाला कापूसही चांगला फुटला. आता घरात पीक येणार ही परिस्थिती असतानाच गेली काही दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली. थोडीही उसंत पाऊस घेत नसल्याने फुटलेला कापूस झाडालाच ओला होत आहे. गळून पडून मातीत खराब होवू नये यासाठी वेचून घरी आणला जात आहे. आता ओल्या कापसाच्या दुर्गंधीने घरात बसणेही कठीण झाले आहे.झाडाला असलेल्या सोयाबीनलाच कोंब फुटली. हा शेतमाल खराब झाला. लागवड खर्चाइतकेही उत्पादन होण्याविषयी शंका आहे. त्यामुळे सर्व मदार कपाशीवर आहे. आता हे पीकही घरात येवून पडले आहे. ते विकताही येत नाही. वाळण्यासाठी आणखी किती दिवस लागणार आणि भाव काय मिळणार याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. कुलर आणि पंख्याचा आधार घेवून कापूस वाळविण्याच्या प्रयोगावर विद्युत कंपनीही पाणी फेरत आहे. वारंवार वीज गुल होते. केव्हा येईल याचा नेम राहात नाही. त्यामुळे बळीराजा चिंतेत सापडला आहे.

टॅग्स :cottonकापूसRainपाऊस