दिग्रसमध्ये राज्यमार्गाला पडल्या भेगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 05:00 IST2019-10-29T05:00:00+5:302019-10-29T05:00:21+5:30

रस्ता तयार होतो न होतो तोच त्याला ठिकठिकाणी भेगा पडल्या आहे. त्यामुळे या रस्त्याची गुणवत्ता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. गेल्या दोन वर्षांपासून दिग्रस ते दारव्हा या राज्य महागामार्गचे काम सुरू आहे. कंत्राटदाराने रस्त्याचे काम सुरु करताना रस्ता संपूर्ण खोदून काढला. त्यामुळे दोन वर्षांपासून वाहनधारकांना या रस्त्यावरून ये-जा करताना धुळीचा नाहक त्रास सहन करावा लागला.

The State Highway in Digress Damaged | दिग्रसमध्ये राज्यमार्गाला पडल्या भेगा

दिग्रसमध्ये राज्यमार्गाला पडल्या भेगा

ठळक मुद्देनिकृष्ट साहित्य : दारव्हा मार्गाच्या चौकशीची मागणी

प्रकाश सातघरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : दिग्रस ते दारव्हा या राज्य महामार्गाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरूच आहे. आता कुठे एकतर्फी रस्ता तयार झाला. मात्र रस्ता तयार होतो न होतो तोच त्याला ठिकठिकाणी भेगा पडल्या आहे. त्यामुळे या रस्त्याची गुणवत्ता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून दिग्रस ते दारव्हा या राज्य महागामार्गचे काम सुरू आहे. कंत्राटदाराने रस्त्याचे काम सुरु करताना रस्ता संपूर्ण खोदून काढला. त्यामुळे दोन वर्षांपासून वाहनधारकांना या रस्त्यावरून ये-जा करताना धुळीचा नाहक त्रास सहन करावा लागला. पावसाळ्यादरम्यान रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने अनेक दुचाकी व मोठ्या वाहनांचे अपघात घडले. अनेक वाहनधारकांना दुखापत झाली. अशा अनेक घटनांनंतर कंत्राटदाराने रस्त्याचे एकतर्फी काम सुरु केले. सिमेंटचा रस्ता तयार केला. मात्र या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे आता स्पष्ट होत आहे.
या सिमेंटच्या राज्य महामार्गाचे बांधकाम करताना कंत्राटदाराने मातीमिश्रीत रेती वापरली. निकृष्ट दर्जाचे सिमेंट वापरले. तसेच सिमेंटचा वापरही कमी केला. त्यामुळे आता या सिमेंट रस्त्याला भेगा पडत आहे. पहिलेच अतिशय संथगतीने काम सुरू असलेल्या या रस्त्यामुळे प्रवाशांचे हात होत आहे. त्यात आता रस्त्याला भेगा पडल्या. त्यामुळे वाहनधारकच संकटात सापडले आहे. अनेक दुचाकी स्लिप होऊन अपघात घडत आहे. मात्र प्रवाशांच्या हिताचे कोणतेही काम या संबंधित कंत्राटदाराकडून होताना दिसत नाही.
वाहनधारकांमध्ये प्रचंड रोष
सिमेंट रस्ता तयार होताच त्याला भेगा पडल्याने वाहनधारकांमध्ये प्रचंड रोष व्यक्त होत आहे. रस्ता तयार करताना निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याने भेगा पडत असल्याचे लक्षात येत आहे. लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या रस्ता कामाची चौकशी करून रस्ता सुरळीत करून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: The State Highway in Digress Damaged