शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
6
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
7
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
8
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
9
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
11
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
12
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
13
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
14
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
15
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
16
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
17
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
18
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
19
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
20
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...

पुसद उपविभागात व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 21:43 IST

व्यापारी महासंघ व औषधी विक्रेता संघाने शुक्रवारी पुकारलेल्या भारत बंदला पुसद, उमरखेड, दिग्रस व महागावमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दिवसभर संपूर्ण बाजारपेठ बंद राहिली.

ठळक मुद्देदिग्रसमध्ये मोर्चा : उमरखेडमध्ये व्यापाऱ्यांचे एसडीओंना निवेदन, महागावात औषधी दुकाने बंद

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद/उमरखेड/दिग्रस/महागाव : व्यापारी महासंघ व औषधी विक्रेता संघाने शुक्रवारी पुकारलेल्या भारत बंदला पुसद, उमरखेड, दिग्रस व महागावमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दिवसभर संपूर्ण बाजारपेठ बंद राहिली.आॅनलाईन शॉपिंग, एफडीआयमध्ये १०० टक्के विदेशी गुंतवणूक, वॉलमार्ट व फ्लिपकार्ट आणि ई-फार्मसीची मान्यता रद्द करण्याची मागणी करण्यात आली. तसेच तुरुंगवास व दंडाची रक्कम कमी करावी, जीएसटीव्यतिरिक्त सर्व कर बंद करावे, पाच लाखांपर्यंत इन्कम टॅक्समध्ये सूट द्यावी आदी मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.पुसदमध्ये उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देताना पुसद केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष रवी पद्मावार, सचिव सुशांत महल्ले, राजेश कोटलवार, चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष सूरज डुबेवार, गिरीष अग्रवाल, संजय बजाज, प्रवीण व्यवहारे, गजानन आरगुलवार, संजय चिद्दरवार, आनंद धूत, विक्रांत जिलेवार, राहुल डुबेवार, संतोष तडकसे, गजानन गादेवार आदी उपस्थित होते.उमरखेड येथे चेंबर आॅफ कॉमर्सने गांधी चौक ते तहसील कार्यालयापर्यंत काळ्या फिती लावून मूकमोर्चा काढला. चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष नारायणदास भट्टड, औषधी संघटनेचे अध्यक्ष विजय भुतडा, विदर्भ स्मॉल स्केल इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संदीप भट्टड यांच्या नेतृत्वात धान्य, किराणा, औषधी, कपडा, बांधकाम साहित्य, हार्डवेअर आदी दुकानदारांनी रॅलीत सहभाग घेतला.दिग्रस शहरात व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद ठेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील बहुतांश व्यापारपेठ बंद होती. नंतर व्यापाऱ्यांनी मागणीचे निवेदन तहसीलदारांना दिले.महागाव येथे भारत बंदमध्ये शहरातील औषधी विक्रेत्यांनी सहभाग घेतला. त्यामुळे शहरातील सर्व औषधी दुकाने बंद होती. औषधी विक्रेत्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले.

टॅग्स :onlineऑनलाइनTaxकर