शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
5
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
6
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
7
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
8
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
9
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
10
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
11
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
12
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
13
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
14
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
15
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
16
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
17
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
18
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
19
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
20
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १५ पोलीस अधिकाऱ्यांना विशेष सेवा पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 05:00 IST

१५ पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस महासंचालक यांच्याकडून प्रदान करण्यात आलेले विशेष सेवा पदक जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी बहाल केले. प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणानंतर हा गौरव सोहळा पार पडला. नक्षलग्रस्त भागात समाधानकार सेवा पूर्ण केल्याबाबत पोलीस महासंचालकांकडून विशेष सेवा पदक दिले जाते.

ठळक मुद्देमहासंचालकांकडून दखल : प्रजासत्ताक दिनी एसपींच्या हस्ते प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा पोलीस दलातील १५ पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस महासंचालक यांच्याकडून प्रदान करण्यात आलेले विशेष सेवा पदक जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी बहाल केले. प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणानंतर हा गौरव सोहळा पार पडला.नक्षलग्रस्त भागात समाधानकार सेवा पूर्ण केल्याबाबत पोलीस महासंचालकांकडून विशेष सेवा पदक दिले जाते. यवतमाळ जिल्ह्यात कार्यरत असलेल्या १५ अधिकाऱ्यांनी गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा या नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये आपली सेवा बजावली. त्याबद्दल हे विशेष सेवा पदक देण्यात आले. यामध्ये वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, नेर ठाणेदार पितांबर जाधव, जिल्हा वाहतूक शाखा प्रमुख अनिल किनगे, ठाणेदार विजय राठोड, पोलीस निरीक्षक मनोज केदारे, घाटंजी ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला, अवधूतवाडी ठाणेदार आनंद वागतकर यांचा समावेश आहे. तर सहायक पोलीस निरीक्षक राजू साळवे, सतीश चवरे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश इंगळे, रामदास नेवारे, योगेश इंगळे, मंगेश भोयर, सचिन पवार, मंगेश भोंगाडे या अधिकाºयांचा समावेश आहे. त्यांना जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते हे विशेष सेवा पदक बहाल करण्यात आले. संघर्षातून मिळविलेल्या या यशाने पोलीस अधिकाºयांचे मनोबल आणखी वाढले आहे.राठोड यांना राष्ट्रपतींचे गुणवत्ता सेवा पदकस्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले सहायक फौजदार साहेबराव राठोड यांना राष्ट्रपतींचे गुणवत्ता सेवा पदक जाहीर झाले आहे. याबद्दल त्यांचा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी सत्कार केला. राठोड यांनी गुन्हे उघडकीस आणण्यासोबतच एक अ‍ॅथ्लेटीक्स म्हणून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे.

टॅग्स :Policeपोलिस