शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

दिग्रस तालुक्यात कृषी विभागाची विशेष मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 05:00 IST

सोयाबीन सवंगणीनंतर भिजणार नाही. तसेच थ्रेशरचा वापर करताना निम्मा वेग (४५० आरपीएम) किंवा कमी दाबाने मळणी करावी, साठवणुकीचे पोते स्वच्छ व कोरडे असावे, आर्द्रता ९ ते १२ टक्के राहील याची खात्री करावी, पोते भिंतीपासून दूर लाकडी पाटीवर एकावर एक केवळ तीन पोतेच हवेशीर व कोरड्या जागेत ठेवावे, असे आवाहन करण्यात आले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना मार्गदर्शन, पुढील हंगामासाठी सोयाबीन बियाण्याची निर्मिती, गावोगावी जनजागृती कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : तालुक्यात कृषी विभागाने पुढील हंगामासाठी सोयाबीन बियाणे राखून ठेवण्याकरिता विशेष मोहीम सुरू केली आहे. पुढील वर्षी सोयाबीन बियाण्याची टंचाई होण्याची शक्यता लक्षात घेऊन कृषी विभागाने ही मोहीम सुरू केली.सध्या सोयाबीन काढणीला सुरुवात झाली आहे. यावर्षी अनेक शेतकऱ्यांना बियाणे मिळाले नाही. हीच स्थिती पुढील वर्षी कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील खरीप हंगामात शेतकऱ्यांना घरचेच सोयाबीन बियाणे वापरता यावे, याकरिता तालुका कृषी अधिकारी एस.एस. राजपुत यांच्या मार्गदर्शनात कृषी विभागाने विशेष मोहीम सुरू केली. यात सोयाबीन बियाणे निर्मिती, काढणी आणि साठवणूक करताना घ्यावयाची काळजी याबाबत मोख, गांधीनगर, विठोली, लाखरायाजी येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.सोयाबीन सवंगणीनंतर भिजणार नाही. तसेच थ्रेशरचा वापर करताना निम्मा वेग (४५० आरपीएम) किंवा कमी दाबाने मळणी करावी, साठवणुकीचे पोते स्वच्छ व कोरडे असावे, आर्द्रता ९ ते १२ टक्के राहील याची खात्री करावी, पोते भिंतीपासून दूर लाकडी पाटीवर एकावर एक केवळ तीन पोतेच हवेशीर व कोरड्या जागेत ठेवावे, असे आवाहन करण्यात आले. या अभियानात मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, आत्माचे कर्मचारी, शेतकरी मित्र शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहे. गावोगावी शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी घरचेच सोयाबीन बियाणे राखून ठेवण्याचे आवाहन केले आहे.रोगट व चुकीची झाडे उपटावीपुढील हंगामासाठी सोयाबीन बियाणे तयार करताना प्रथमच शेतातील रोगट आणि चुकीची झाडे उपटून काढावी. शेवटच्या फवारणीला आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर करावा, गरजेनुसार शेतकऱ्यांनी क्षेत्र निश्चित करून तेथीलच पिकाचे बियाणे राखून ठेवावे. याशिवाय पुढील हंगामापर्यंत नेमकी कोणती काळजी घ्यावी याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे. पुढील हंगामात बियाणे उत्पादक कंपन्या बियाणे विक्रीकडे पाठ फिरवतील, असे लक्षात येत आहे. त्यामुळे कृषी विभागाने ही मोहीम सुरू केली आहे.बियाण्याच्या तुटवड्याची शक्यतापुढील हंगामात सोयाबीन बियाण्याच्या तुटवड्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घरचेच सोयाबीन बियाणे राखून ठेवणे आवश्यक झाले आहे. यावर्षी शेतकऱ्यांना चढ्या दराने बियाणे खरेदी करावे लागले. त्यातही निकृष्ट बियाण्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. यंदा घरीच बियाणे तयार केले जात आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती