शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन बियाणे पोहोचले आठ हजारांवर

By admin | Updated: May 20, 2014 23:57 IST

शेतकरी बाजारापेठेत माल विक्रीसाठी असो, की बियाणे खरेदीसाठी त्याची आर्थिक पिळवणूक निश्चित आहे. शेतकर्‍याचे सोयाबीन ३५०० रुपये दाराने खरेदी केले.

यवतमाळ : शेतकरी बाजारापेठेत माल विक्रीसाठी असो, की बियाणे खरेदीसाठी त्याची आर्थिक पिळवणूक निश्चित आहे. शेतकर्‍याचे सोयाबीन ३५०० रुपये दाराने खरेदी केले. आता त्याच शेतकर्‍यांना सोयाबीनच्या एक क्विटंल बियाण्यासाठी आठ हजार रुपये मोजावे लागत आहे. वाढलेल्या लागवड खर्चामुळे शेतकर्‍यांचे नियोजन कोलमडले आहे. बियाणे महामंडळाने शेतकर्‍यांकडून घेतलेल्या सोयाबीनची उगवण शक्ती कमी असल्यामुळे ६ हजार ५०० क्विंटल सोयाबीन बियाणे अप्रमाणित केले आहे. याशिवाय सोयाबीने बियाणे पावसामुळे खराब झाले आहे. अशा स्थितीत शेतकर्‍यांना सोयाबीनचे बियाणे मिळविताना चांगलीच कसरत करावी लागत आहे. यावर्षी बियाण्याचा भाव दुपटीने वाढला आहे. तीस किलोच्या बॅगसाठी शेतकर्‍यांना दोन हजार ४०० रुपये मोजावे लागत आहे. शेतकर्‍याचे सोयाबीन मात्र सुरूवातील केवळ तीन ते साडेतीन हजार रुपये दराने खरेदी केले. सोयाबीन बियाण्याच्या वाढलेल्या दराने शेतकर्‍याचे नियोजन कोलमडले आहे. बँकांनी कर्ज वाटप करताना सोयाबीनसाठी हात आखडता घेतला आहे. हेक्टरी २२ हजार रुपयांप्रमाणे कर्ज देण्यात येत आहे. एकरी आठ हजार ८०० रुपये शेतकर्‍यांना मिळणार आहे. सोयाबीनच्या एका एकराला केवळ लागवडीसाठी पाच हजार ४०० रुपये खर्च येणार आहे. यातही पावसाच्या अनियमिततेमुळे दुबार पेरणीचे संकट ओढावल्यास शेत पडीक ठेवण्याची वेळ शेतकर्‍यांवर आहे. कपाशीच्या तुलनेत कमी खर्च येत असल्याने शेतकर्‍यांची गेल्या काही वर्षात सोयाबीनवरच भिस्त आहे. मात्र आता यावर्षी सोयाबीन बियाण्याच्या दाराने शेतकर्‍यांना अडचणीत आणले आहे. कापसाचा एकरी लागवड खर्च अधिक असून त्या तुलनेत बाजार भाव मिळत नाही. शिवाय नैसर्गिक आपत्ती आल्यास होणारे नुकसानही प्रचंड असते. या पिकासाठी मजुराचीही मोठ्याप्रमाणात गरज भासते. यासर्व अडचणीला पर्याय म्हणून शेतकरी गेल्या काही वर्षात सोयाबीनच्या लागवडीकडे वळला होता. आता दुसरे कोणते पर्यायी पीक घ्यावे असा, प्रश्न शेतकर्‍यांसमोर निर्माण झाला आहे. बियाणे दरवाढ पहता जिल्हा मध्यवर्ती बँकेने कर्ज मर्यादा वाढविण्यासाठी २३ मे रोजी कर्ज समितीची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत सोयाबीनसाठी हेक्टरी २३ हजार तर कपसाकरिता ३२ हजार रुपये कर्ज देण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र राष्ट्रीयकृत बँकाकडून शेतकर्‍यांना कर्ज देतांना नियमात फेरबदल करण्यास तयार नाहीत. (कार्यालय प्रतिनिधी)