शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन खरेदीत ‘आधार’ तुटला

By admin | Updated: November 10, 2016 01:28 IST

अस्मानी संकटाला तोंंड देत घरात आलेल्या सोयाबीनचा खरेदीत मात्र आधार तुटला. आधारभूत किंमती खाली खरेदी सुरू असल्याने

उमरखेडमध्ये सर्वाधिक खरेदी : जिल्ह्यात दोन लाख क्ंिवटलची आवक, व्यापाऱ्यांची मनमानी यवतमाळ : अस्मानी संकटाला तोंंड देत घरात आलेल्या सोयाबीनचा खरेदीत मात्र आधार तुटला. आधारभूत किंमती खाली खरेदी सुरू असल्याने बळीराजाची आर्थिक कोंडी सुरू आहे. जिल्ह्याच्या सर्वच बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक वाढली असतानाच व्यापाऱ्यांनी मनमानी सुरू केली आहे. यावर कुणाचेही नियंत्रण नाही. परिणामी शेतकरी नाडवला जात असल्याचे चित्र सर्वदूर आहे. यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख क्ंिवटल सोयाबीनची खरेदी व्यापाऱ्यांनी केली. यात उमरखेड टॉपवर आहे. खरेदी करताना व्यापाऱ्यांनी मात्र दोन हजार ७७५ रुपये प्रति क्ंिवटल हा आधारभूत दर गुंडाळून ठेवला आहे. सोयाबीन बाजारात येण्याची सुरूवात होत नाही तोच भाव पाडण्यात आले. दिवाळीत शेतकऱ्यांच्या गरजेचा फायदा घेत केवळ एक हजार ८०० रुपये क्ंिवटल दराने खरेदी करण्यात आली. या काळातच मोठी उलाढाल झाली. पुढे आवक थोडीफार कमी होताच दोन हजार-दोन हजार ४०० ते दोन हजार ७०० पर्यंत भाव नेऊन ठेवण्यात आला. हाच यावर्षीचा सर्वाधिक दर सध्या तरी ठरला आहे. परतीच्या पावसाने सोयाबीनने मार खालल्यानंतर व्यापाऱ्यांकडून कमी दराचा दणका सहन करावा लागत आहे. गतवर्षी तीन हजार ७०० प्रति क्ंिवटल दराने सोयाबीनची खरेदी झाली होती. यावर्षी तब्बल एक हजार रुपये घसरण झाली आहे. नाफेडने आपले खरेदी केंद्र सुरू केले असले तरी ते नामधारीच ठरत आहे. सोयाबीनचा एकही दाणा या एजंसीकडे शेतकऱ्यांनी दिला नाही. विविध अटी ठेवल्याने शेतकऱ्यांनी या एजंसीकडे पाठ फिरविली आहे. दाणा ओला नको, कुठलाही कचरा नको, सातबाऱ्यावर सोयाबीनच्या पेऱ्याची नोंद असावी. यानंतर खरेदी झालेल्या सोयाबीनचे पैसे धनादेशाच्या माध्यमातून मिळणार आहे. हा धनादेश पाच ते आठ दिवसात वटविला जातो. यासोबतच थकीत कर्ज कापले जाण्याचीही भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. यामुळे नाफेडच्या खरेदीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे. नाफेडने खुल्या बाजारात उतरुन हमी दराने सोयाबीनचे खरेदी केली तर खुल्या बाजारात सोयाबीनचे भाव वाढतील आणि शेतकऱ्यांना फायदा होईल. यासोबतच १६ ही तालुक्यात केंद्रांची आवश्यकता आहे. (शहर वार्ताहर)